Chat GPT Viral News Viral
व्हायरल न्यूज

Chat GPT Viral News : आयडीयाची कल्पना फसली! ChatGPT वापरून विद्यार्थ्यानं होमवर्क केला; एका चुकीमुळं मास्तरांनी पकडला

ChatGPT Use : अगदी कोणत्याही समस्येचे उत्तर हे सहज देते. याचा वापर लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण करत आहे.

कोमल दामुद्रे

School Student Use ChatGPT : ChatGPT हे गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च करण्यात आले होते. या OpenAI च्या ChatGPT ने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. अगदी कोणत्याही समस्येचे उत्तर हे सहज देते. याचा वापर लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण करत आहे.

'चॅट जनरेटिस प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर' (ChatGPT) हा एक चॅटबॉट आहे जो विविध प्रश्नांची लेखी पण जवळपास सगळी उत्तरे बरोबर देऊ शकतो. हे डिझाइन करताना अशाप्रकारे केले आहे की यातील सगळी उत्तरे ही मानवाच्या कल्पनेसारखी जुळवलेली आहेत.

विचार करा की, तुमच्या मुलांने (Child) शाळेच्या अभ्यासासाठी या ChatGPT चा वापर केला तर काय होईल ? असाच एक मुलांने केलेला इंग्रजीचा गृहपाठ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका सातवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या मुलांने या ChatGPT चा वापर करुन इंग्रजीचा गृहपाठ केला आहे. परंतु तो एका चुकीमुळे पकडला गेला व त्यावर युजर्स म्हणताय की, कॉपी (Copy) करण्यासाठी सुद्धा डोक लागत...

1. होमवर्क झाला व्हायरल

रोशन पटेल (@roshanpateI) यांनी 1 जून रोजी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. त्याने कॅप्शन दिले की, "माझा धाकटा चुलत भाऊ अर्जुनने चॅटजीपीटीचा वापर करून त्याचा 7 वीच्या वर्गाचा इंग्रजी गृहपाठ पूर्ण केला आणि तो पकडला गेला." या व्हायरल शीटमध्ये एक ओळ आणि शब्दही हायलाइट करण्यात आला आहे. इयत्ता 7 मधील विद्यार्थी सहसा त्यांच्या उत्तरांमध्ये अशा हार्ड शब्दांचा वापर करत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्याची हुशारी पकडली गेली. या बातमीला जवळपास 12 लाख व्ह्यूज आणि 5 हजार लाईक्स मिळाले आहेत.

2. युजर्सने कमेंट केली की, कॉपी करण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते.

हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा नेटकऱ्यांना हसू आवरता आले नाही. काहींनी सांगितले की, आजची मुले तंत्रज्ञानाचा चांगलाच वापर करत आहेत. तसेच शिक्षकांनी देखील स्मार्ट व्हायला हवे. हा मुलगा त्याच्या एका चुकीमुळे एका मिनिटात पकडली गेली. तर एका युजर्सने म्हटले की, कॉपी करण्यासाठी देखील अक्कल लागते. तर काही म्हणाले की, हे सगळ स्क्रिप्टेड आहे. तर तुम्हाला काय वाटतं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अशा AI तंत्रज्ञानाचा वापर गृहपाठासाठी करणं योग्य आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काजू-बादाम वरदान की शाप? तज्ज्ञांचा हा खुलासा वाचायलाच हवा

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

'गोकुळ'च्या राजकारणात मोठा भूकंप! सतेज पाटलांचा खळबळजनक दावा, ४ संचालकांवरून कोल्हापूरमध्ये वातावरण तापणार

SCROLL FOR NEXT