Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : चेहऱ्यांवर थुंकी लावून केलं फेस मसाज; सलूनमधील संतापजनक घटनेचा VIDEO व्हायरल

Applying Spit for Face Massage : सोशल मीडियावर एक असा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही पार्लर किंवा सलूनमध्ये जाण्याआधी १० वेळा विचार कराल.

Ruchika Jadhav

सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या काही मेकअपचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसतायत. सुंदर दिसण्यासाठी मुलींसह मुलं देखील पार्लरमध्ये जातात आणि विविध फेशीअल, फेसमसाज, स्क्रब करून घेतात. अशात सोशल मीडियावर एक असा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही पार्लर किंवा सलूनमध्ये जाण्याआधी १० वेळा विचार कराल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सलूनमध्ये एका तरुणाचं फेस मसाज सुरू आहे. हे करताना सलूनमधील व्यक्तीने कस्टमरच्या चेहऱ्यावर क्रिम लावली आहे. क्रिम लावून आता आपला चेहरा मस्त चमकणार या विचारात हा तरुण असेल मात्र त्याच्याबरोबर अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे.

जो व्यक्ती त्याचं फेस मसाज करत असतो तो त्या तरुणाच्या चेहऱ्यावर थुंकतो. आपल्या थुंकीने तो त्याच्या फेसला मसाज करतो. हा अतिशय घाणेरडा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील ही घटना असल्याचं समजलंय. कस्टमरला याबद्दल थोडी शंका आली होती. त्यामुळे त्याने सीसीटीव्ही चेक केले. तेव्हा सीसीटीव्ही व्हिडिओपाहून त्याचा मोठा संताप झाला. कस्टमरने हा व्हिडिओ स्वत:च्या फोनमध्ये घेतला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी देखील या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच पुढील कारवाई सुरू केलीये. सलून मालक या घटनेनंतर तेथून फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT