VIDEO: युतीत 'भुजबळ' नाही? महायुतीच्या बैठकीला भुजबळांची गैरहजेरी, नाराजीच्या चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal: नाशिक शिक्षक विभाग मतदार संघासाठी आज महायुतीची बैठक झाली..या बैठकीकडे छगन भुजबळ यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय.. नाशिकमध्ये असूनही भुजबळांनी बैठकीला हजेरी न लावल्यानं आता चर्चांना उधाण आलंय.
युतीत 'भुजबळ' नाही? महायुतीच्या बैठकीला भुजबळांची गैरहजेरी, नाराजीच्या चर्चांना उधाण
Chhagan BhujbalSaam Tv

नाशिक शिक्षक विभाग मतदार संघासाठी महायुतीची बैठक झाली..या बैठकीकडे छगन भुजबळांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय.. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार रिंगणात उतरलेत. दराडेंच्या प्रचाराची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. मात्र या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांनी पाठ फिरवल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र भुजबळांनी नाराजीच्या चर्चांना नकार दिलाय.

लोकसभा निवडणुकीतही नाशिकच्या जागेवरुन भुजबळांना माघार घ्यावी लागली होती. तेव्हापासूनच छगन भुजबळांचं बिनसलंय..त्यात पुन्हा भुजबळांसाठी राज्यसभेतून केंद्रात जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यावरही सुनेत्रा पवारांच्या वर्णीनं पाणी फिरलं.

युतीत 'भुजबळ' नाही? महायुतीच्या बैठकीला भुजबळांची गैरहजेरी, नाराजीच्या चर्चांना उधाण
VIDEO: मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन? आमदारांना सूचना, आदेश आणि अलर्ट

त्यामुळे महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकीला भुजबळ गैरहजर राहील्यानं पुन्हा भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा रंगतायत मात्र आता भुजबळ काय करणार असाही सवाल उपस्थित झालायं. त्यावर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी भुजबळांची नाराजी दूर करावी असं म्हटलंय.

दरम्यान,अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महेंद्र भावसार यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला होता. महायुतीने उमेदवार दिलेला असतानाही अजित पवार गटाने निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत महायुतीत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र असतानाच आमदार माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यानं महायुतीत सारं काही अलबेल नसल्याचं चित्रय...

युतीत 'भुजबळ' नाही? महायुतीच्या बैठकीला भुजबळांची गैरहजेरी, नाराजीच्या चर्चांना उधाण
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेलच्या किंमती वाढणार? कर्नाटकात इंधनाच्या दरात 3 रुपयांनी वाढ

लोकसभेत नाशिकच्या जागेवरुन झालेल्या राजकीय नाट्यानंतर आता पुन्हा पदवीधर निवडणुकीत शिंदे गट आणि अजित दादांची राष्ट्रवादी आमने-सामने आलेत.त्यात नाराज भुजबळ काय करणार? यावर नाशिकसह महायुतीचं पुढचं गणित नक्कीच अवलंबून असणार आहे. त्यामुळे विधानसभेआधीच महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com