ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर प्रचंड गजबजलेलं शहर आहे. उल्हासनगरमध्ये सिंधी लोकांची मोठी वस्ती आहे. याच उल्हासनगरमध्ये बटर पापडी हा पदार्थ लोक आवडीने खातात. शहरातील प्रत्येक नाक्यावर बटर पापडी विक्रेता पाहायला मिळतो. मुंबईत जशी पाणीपुरी प्रसिद्ध आहे, तशी उल्हासनगरमध्ये बटर पापडी प्रसिद्ध आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हीच उल्हासनगरची बटर पापड बॉलिवूडचा भाईजान सलमान खान खात आहे, असा दावा एका व्हिडिओतून करण्यात येत आहे. सलमान खानचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळतात. सेलिब्रिटींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते टपूनच बसलेले असतात. चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेते आणि अभिनेत्रींचे व्हिडिओ आवडीने पाहतात आणि शेअर करत असतात. सोशल मीडियावर प्रत्येक अभिनेते आणि अभिनेत्रींचा मोठा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. याच भाईजानचा बटर पापडी खातानाचा कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. कथित व्हिडिओ पाहून चाहतेही चकीत झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये बटर पापडी पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. सिंधी लोकांसहित मराठी माणसेही बटर पापडी आवडीने खातात. बटर पापडी खाण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अशाच गर्दीचा भाग होऊन सलमान खान बटर पापडी खात असल्याचा दावा केला जात आहे. सलमान खान सर्वसामान्य लोकांसारखा बटर पापडी खात असल्याचा दावा केला जात आहे. कथित सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कथित सलमानचा व्हिडिओ हा 'अपना उल्हासनगर' या इन्स्टाग्राम अकाऊंट हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. एकाने मिश्किलपणे, 'सलमान मोटवाणी, म्हटलं आहे'. उल्हासनगरमधील स्वस्त सलमान खान असल्याचंही एकाने म्हटलं आहे.
दरम्यान, सलमान खानच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. कथित सलमानच्या व्हिडिओला ५००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर शेकडो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.