Viral Video on Antilia saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: युरोपचा सर्वात श्रीमंत व्यक्ती जेव्हा अंबानीच्या गेटवर येतो, नेमकं पुढे काय घडले..., पाहा व्हायरल VIDEO

Viral Video on Ambani House: मुकेश अंबानींचे प्रसिद्ध अँटिलिया घर बाहेर दोन इंग्रजी YouTubers पोहोचले. त्यांनी गार्डला अंबानींचे मित्र असल्याचे सांगितले. हा क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला असून व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Dhanshri Shintre

अंबानींच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांनी दोन्ही यूट्यूबर्सला धडक दिली आणि त्यांना कठोर शब्दांत चांगला धडा शिकवला. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, दोन्ही यूट्यूबर्सनी अंबानींचे मित्र असल्याचा दावा केला आणि गेटवर असलेल्या गार्डसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी, एक यूट्यूबर स्वतःला 'युरोपचा अंबानी' असल्याचे सांगत होता. सुरक्षा रक्षकांनी त्यांना कडक शब्दांत सांगितले की, हे घर आहे, रेस्टॉरंट नाही. या घटनेने सोशल मीडियावर एक खळबळ उडवली आहे, ज्यामुळे या यूट्यूबर्सवर तीव्र प्रतिक्रिया उमठल्या आहेत.

मुकेश अंबानी यांचे प्रसिद्ध घर अँटिलिया २००६ मध्ये दक्षिण मुंबईत उभारले गेले. या आलिशान ६ मजली इमारतीची किंमत अंदाजे १५००० कोटी रुपये आहे. अँटिलियाच्या आत जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मंदिर आणि आरोग्य सेवा यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. इमारतीचे सुसज्ज आणि देखभाल करणारे ६०० कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. अँटिलिया हे एक अत्याधुनिक आणि आलिशान घर असून, याची संरचना आणि सुविधा जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या घराची भव्यता आणि विलासिता हे अंबानी कुटुंबाच्या समृद्धीचे प्रतीक बनले आहे.

या व्हिडिओत अंबानींच्या अँटिलियाच्या गेटवर दोन परदेशी पुरुष गार्डसोबत वाद घालत आहेत. ते गार्डला सांगतात की अंबानींनी त्यांना बोलावले आहे आणि ते अंबानींचे मित्र आहेत. त्यांनी सांगितले की, ते श्रीमंत घराण्याचे असून अंबानींच्या लग्नात भेटले होते. त्यांना प्लेस्टेशन खेळायचे असल्यास ते अँटिलियाला येऊ शकतात, असे अंबानींनी सांगितले होते. हे दोघे स्वतःला श्रीमंत आणि महत्त्वाचे व्यक्ती मानत गार्डसोबत वाद घालत होते, ज्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांमध्ये तणाव निर्माण झाला.

घटनेच्या दरम्यान, गार्ड त्या परदेशी व्यक्तीला सतत विचारत होता, "तुमच्याकडे आमंत्रण आहे का?" गार्डने त्यांना मेल किंवा संदेश दाखवण्यास सांगितले, परंतु त्या व्यक्तीने उत्तर दिले की अंबानींनी त्यांना कधी तरी येण्यास सांगितले होते. गार्ड त्यांना सांगतो की अंबानी घरात नाहीत, त्यावर त्या व्यक्तीने म्हणाले की, "आम्ही आत थांबू." या चर्चेने गार्ड आणि परदेशी व्यक्ती यांच्यात तणाव निर्माण केला.

हे ऐकून गार्ड त्यांना सांगतो, "हे घर आहे, रेस्टॉरंट नाही!" यावर YouTuber उत्तर देतो, "जेव्हा अंबानी बालीला आले, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांचे राजासारखे स्वागत केले. जर हे माझे घर असते, तर मी त्यांना फोन करेन." व्हिडिओच्या शेवटी, तो व्यक्ती स्वतःला 'युरोपचा अंबानी' म्हणवून तेथून निघून जातो.

ट्विटरवर @ghar ke kalesh यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, यूट्यूबर्स अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओला पोस्ट होताच ५५००० हून अधिक व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर या क्लिपवर जोरदार चर्चा रंगली आहे. यूजर्स त्यावर विविध प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT