65-year-old Mangal Awale from Karad drives her auto rickshaw fearlessly, proving age is just a number. saam tv
व्हायरल न्यूज

Karad News: 65 व्या वर्षी कराडच्या आजीची बुंगाट रिक्षा, निवृत्तीच्या वयात हाती घेतलं अनोख्या जबाबदारीचं स्टेअरिंग

65-Year-Old Grandmother Drives an Auto Rickshaw: कराडमधली 65 वर्षाची आजी सुसाट रिक्षा चालवताहेत. मात्र त्यांना या वयातही का रिक्षा चालवावी लागत आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

ही बुंगाट रिक्षा चालवणाऱ्या या आहेत कराड तालुक्यातील नांदगावच्या मंगल आवळे आजी. वयाची पासष्टी गाठलीय. या वयात अनेकजण कामातून निवृत्ती घेतात.पण मंगल आजींनी 65 व्या वर्षी धाडस करुन हाती रिक्षाची स्टेअरिंग घेतलीय. मात्र या धाडसामागची कहाणीच आजींनी उलगडून सांगितलीय.

खरंतर मंगल आवळेंना 3 मुली आणि 1 मुलगा, मुलं लहान असतानाच नवऱ्याचा मृत्यू झाला आणि मंगल आवळेंवर आभाळच कोसळलं. त्यांनी मुलांना शिकवलं आणि मुलगा एसटी ड्रायव्हर बनला. त्याच मुलाने आईच्या हट्टापायी तिला रिक्षा शिकवली. आता आजी सराईतपणे गर्दीतूनही वाट काढत रिक्षा चालवतात.कधी कुणाला धक्काही लागणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळेच 65 वर्षीय मंगला आजीच्या रिक्षात प्रवासी निर्धास्तपणे बसतात.

टु व्हीलर असो वा फोर व्हीलर. ती शिकताना अनेकांची तारांबळ उडते. मात्र निवृत्तीच्या वयात शुगरच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी रिक्षाची स्टेअरिंग हाती घेतलीय. आता रिक्षा चालवून आजीला 500 ते 600 रुपये मिळतात. त्यामुळे शिकायला वय लागत नाही.तर फक्त इच्छा असावी लागते. हे या आजीनं सिद्ध करुन दाखवलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT