WOMAN DIES OF SUDDEN HEART ATTACK DURING KARVA CHAUTH FESTIVAL 
व्हायरल न्यूज

Viral Video: नवऱ्यासाठी व्रत केला, सेलीब्रेशनवेळी डान्स करताना महिला कोसळली, नवऱ्यासमोरच सोडला जीव

Punjab Viral Video: करनालमध्ये करवा चौथ साजरा करताना एका विवाहित महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

Dhanshri Shintre

पंजाबमधील करनाल येथून करवा चौथच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दीर्घायुष्यासाठी उपवास धरलेल्या एका विवाहित महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना करवा चौथच्या जल्लोषात सहभागी होत असताना घडली. ज्यामुळे उपस्थित सर्वजण शॉक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या करवा चौथ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये घडली. सर्व महिला पारंपारिक वेशभूषेत सजून गाणी आणि नृत्य करत उत्सवात सहभागी होत होत्या. त्याच दरम्यान ही महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत नाचत असतानाच अचानक खाली पडली. लोकांनी लगेच तिला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले.

तिथे असलेल्या लोकांनी सांगितले की ती महिला आनंदी होती आणि कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होत होती. काही क्षणांपूर्वी ती इतरांसोबत गाणी गात होती. परंतु अचानक तिला छातीत वेदना होऊ लागल्या आणि काही सेकंदांतच ती जमिनीवर पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून लोकांमध्ये खळबळ माजली आहे.

डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका अचानक आला असावा आणि कदाचित आधीपासून असलेली हृदयविकाराची समस्या यामागे कारणीभूत असू शकते. करवा चौथचा सण हा पतिपत्नीच्या नात्याचे प्रतीक मानला जातो. मात्र या घटनेने सणाच्या साजरीकरणात दुःखाचे सावट पसरले आहे. परिसरातील लोकांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून सोशल मीडियावर लोकांनी महिलेला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनरला लागली आग

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान

Diwali Good Luck: दिवाळीत करा हे ५ सोपे वास्तु उपाय, सुख - समृद्धीसह, लक्ष्मी येईल घरात

Bhaubeej Gift : यंदाची भाऊबीज कायम राहील लक्षात, भावंडांना द्या टेक-फ्रेंडली गिफ्ट्स

Gold Silver Price : दिवाळीआधी चांदीच्या दरातही रेकॉर्डब्रेक वाढ, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

SCROLL FOR NEXT