Pune Station Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Pune Station Viral Video: कसली निर्दयता! गाढ झोपलेले प्रवासी अन् पोलिसाने केले असे कृत्य.. पुणे स्टेशनवरील व्हिडिओवर संतापले नेटकरी

Gangappa Pujari

Railway Station Viral Video: रेल्वे प्रवास म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर गर्दीने भरलेली ट्रेन आठवते. रेल्वेने प्रवास करताना जितकी गर्दी आपल्याला ट्रेनमध्ये दिसते तितकीच गर्दी स्टेशनवरही पाहायला मिळते. कुणी पुढच्या ट्रेनची वाट पाहत असतं तर कोणी चुकलेल्या ट्रेनमुळे निराश झालेले असतात. अशावेळी अनेकदा रेल्वे स्टेशनवर मुक्कामाचीही वेळ येते.

मात्र स्टेशनवर झोपल्यानंतर इतर प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून पोलिस प्रशासन लगेच न झोपण्याचा सल्ला देत असतात. सध्या असाच एक रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसाने झोपलेल्या प्रवाशांना जागे करण्यासाठी केलेल्या कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे व्हिडिओ...

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. जो पुणे स्टेशनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टेशनवर अनेक लोक झोपलेले आहेत. ज्यांना उठवण्यासाठी एका पोलिसाने थेट पाण्याचा वापर केल्याचे दिसत आहे. हातात बॉटल घेवून तो पोलीस कर्मचारी झोपलेल्या प्रवाशांच्या तोंडावर ओतत आहे.

अचानक थंड पाणी अंगावर पडल्याने हे प्रवासी खडबडून उठत असून अनेक वयोवृद्ध व्यक्तींना याचा चांगलाच त्रास झाल्याने चांगलेच वैतागल्याचे दिसत आहेत. पोलिसाच्या या कृतीने नेटकरी मात्र चांगलेच संतापले असून हे निंदनीय कृत्य असल्याचे सांगत निषेध व्यक्त केला आहे.  (Latest Marathi News)

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप....

अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना प्लॅटफॉर्मवर झोपल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होते परंतु ज्या पद्धतीने लोकांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला आहे, ते योग्य नसल्याचे अनेकांनी म्हणले आहे. तसेच काही जणांनी माणुसकी आहे की नाही म्हणत पोलिसाच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ (Viral Video) २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्याला ११ हजारांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT