Pune Viral Poster News:  Saamtv
व्हायरल न्यूज

Pune Viral Hording: पुणे म्हणजे 'विषय हार्ड'! हेल्मेट घालण्यासाठी अनोखी जनजागृती, थेट बाहुबलीला उतरवलं मैदानात; पाहा फोटो

Pune Viral Poster News: पुणेरी पाट्यांचे अनेक किस्से, गमतीजमती तुम्ही ऐकल्या असतील. सध्या पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनीही असाच एक बॅनर लावत वाहन चालकांना संदेश दिला आहे. हा बॅनर सध्या सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

Gangappa Pujari

वाहन चालवताना हेल्मेट वापरा, सुरक्षित राहा असा संदेश नेहमी दिला जातो. मात्र अनेक वाहनचालक विना हेल्मेट गाडी चालवताना दिसतात. हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडूनही अनेक उपक्रम राबवले जातात. सध्या पुण्यातील असाच एक हेल्मेट वापरण्याचे आवाहन करणाऱ्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हेल्मेटबाबत जनजागृतीची ही भन्नाट आयडिया पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

'पुणे तिथे काय उणे', असं म्हणतात ते उगाच नाही. पुणेरी पाट्या, पुणेकरांचे टोमणे, पुणेकरांची भाषा याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मोजक्या शब्दात पानउतारा करण्याबाबत त्यांचा हात कोणीच धरु शकत नाही. ज्याचे अनेक किस्से, गमतीजमती तुम्ही ऐकल्या असतील. सध्या पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनीही असाच एक बॅनर लावत वाहन चालकांना संदेश दिला आहे.

या पोस्टरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर लिहलेला मजकूर. या बॅनरवर बाहुबलीचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत बाहुबली जर हेल्मेट घालत असेल तर आपण का लाजतो? हेल्मेट वापरा सुरक्षित राहा,' असा संदेश लिहला आहे. हा हटके बॅनर येणा- जाणाऱ्या वाहन चालकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शिवाजीनगर वाहतूक विभागाकडून हा बॅनर लावण्यात आला आहे. पुणेरी गाईड या पेजवर शेअर करण्यात आलेला हा फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधते आहे. या फोटोवर कमेंट्स करत अनेकांनी या अनोख्या बॅनरचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी हा संदेश मनावर घेऊन हेल्मेट वापरण्याचे आवाहनही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT