Viral Food Video: SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Viral Food Video: कोल्ड आणि हॉटनंतर आता मार्केटमध्ये आलीये कुकर कॉफी; शिट्टीवर होते तयार, पाहा VIDEO

Viral Food Video: सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडिओचा एक खजिना आहे.रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Food Video

सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडिओचा एक खजिना आहे.रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओ हे भंयकर अपघातांचे असतात तर काही क्षुल्लक गोष्टीवरुन भांडणाचे असतात. सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीच्या कलागुणांना वाव देणारा सर्वांत सोप्पा आणि वेगवान मार्ग आहे. या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेला प्रसिद्ध खाद्यपदार्थही लगेत फेमस होतो शिवाय पदार्थ बनवणारा ही लगेच प्रकाशझोतात येतो

प्रत्येक भारतीयांच्या दिवसाची सुरुवात ही कडक मसालेदार चहा आणि न्यूजपेपरने होते. या दोन गोष्टींची काही लोकांना एवढी सवय लागलेली असते की जर चहा आणि न्यूजपेपर नाही मिळाला तर सपूर्णं घर डोक्यावर घेतात. पण ज्या प्रमाणात आपल्याकडे चहाप्रेमी असंख्य आहेत तसंच कॉफीप्रेमी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही कॉफी प्रेमी आहात का? जर असाल, तर तुम्ही कधी कुकर कॉफीबद्दल ऐकले आहे का? जर तुम्ही ऐकले नसेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, या व्हिडिओत एक काका सायकलवर कॉफी विकताना आपल्याला दिसत आहे. या काकांची कॉफी मोठमोठ्या कॅफेमधल्या कॉफी मशिनवर बनवलेल्या कॉफीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. व्हिडिओत बनवलेल्या कॉफीची वेगळी गोष्ट म्हणजे त्याची बनवण्याची पद्धत.

नेमकं काय वेगळं आहे या कॉफीत..?

ही कॉफी आपल्या रोजच्या भात बनवण्याच्या कुकरच्या साहाय्याने तयार केली जात आहे. कुकरच्यावरच्या भागात जी शिट्टी असते त्याला विशेष अशी पाईप जोडली आहे. त्या वाफेच्या मदतीने कॉफी तयार केली जात आहे. या देशी जुगाड पाहून सर्वजण चक्रावून गेले आहेत.

नेमकं काय वेगळं आहे या कॉफीत..?

ही कॉफी आपल्या रोजच्या भात बनवण्याच्या कुकरच्या साहाय्याने तयार केली जात आहे. कुकरच्यावरच्या भागात जी शिट्टी असते त्याला विशेष अशी पाईप जोडली आहे. त्या वाफेच्या मदतीने कॉफी तयार केली जात आहे. या देशी जुगाड पाहून सर्वजण चक्रावून गेले आहेत.

@thegreatindianfoodie या इन्स्टांग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजण्यात आले नाही. आजवर आपण भारतातील अनेक जुगाडू लोकांचे व्हायरल व्हिडिओ पाहिले आहेत. पण हा एक जुगाड असा आहे की आपण महागातल्या कॅफेमध्ये जायच्या आधी या काकांच्या कॉफीचा नक्कीच विचार करू

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षांव केला आहे. एका यूजर्संने लिहीलं आहे की,'हे भारतीय जुगाडू लोक आहेत' यासह व्हिडीओवर अनेक गंमतीदार प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

Amruta Khanvilkar: अमृताच्या सौंदर्याने केलाय कहर; PHOTO पाहा

मुंबईत पावसाचं रौद्ररूप! दादरमध्ये शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT