Vishal Gangurde
काही जणांना रोज-रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. त्यांच्यासाठी चांगला झटपट बनणारा पदार्थ घेऊन आलो आहोत.
अर्धवट दळलेल्या गव्हाला दलिया म्हटलं जातं. त्याच्यापासून हा पदार्थ तयार केला जातो.
दालिया बनविण्यासाठी कांदा, गाजर, शिमला मिरची, घेवडा बारीक चिरून घ्या.
दालिया कुकरमध्ये अगदी भाताप्रमाणे शिजवून घ्यावा.
फोडणी करताना कडीपत्ता, बारीक चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढून घ्यावी
त्या फोडणीत दलिया घालून आवडीनुसार तिखट, मसाला, धनेजीरे पावडर, मीठ घालावे.
त्यानंतर व्यवस्थित वाफ आणून शेवटी वरुन कोथिंबीर घालावी. त्यानंतर तुमचा दालिया तयार.