Police Giving CPR to Snake  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: बाप रे बाप! पोलिसाने चक्क सापावर केले प्रथमोपचार; तोंडाने श्वास देतानाचा VIDEO व्हायरल

Police Giving CPR to Snake: एका पोलीस कर्मचाऱ्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सापाचा चक्क सीपीआर देऊन जीव वाचवला आहे.

Satish Daud

Police Giving CPR to Snake

साप हा जगातील सर्वात विषारी जीव असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच सापाचं नाव जरी ऐकलं, तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाला पाहताच अनेकांची हवा टाईट होते. कुणी त्याला मारण्यासाठी काठी शोधतं, तर कुणी तेथून पळ काढतं. पण, एका पोलीस कर्मचाऱ्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सापाचा चक्क सीपीआर देऊन जीव वाचवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाचून धक्का बसेल, पण हे खरं आहे. हा संपूर्ण प्रकार मध्यप्रदेशात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. अनेकांकडून या पोलीस कर्मचाऱ्याचं कौतुक केलं जातंय. तर काहींनी हा निव्वळ मुर्खपणा असल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील एका कॉलनीमधील पाइपलाइनमध्ये साप असल्याचं तेथील रहिवाशांना दिसून आलं. सुरुवातीला त्यांनी काठीने या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण साप काही बाहेर येत नव्हता. यामुळे त्यांनी कीटकनाशकाने भरलेलं पाणी पाइपलाइनमध्ये ओतलं.

त्यामुळे साप बेशुद्ध होऊन बाहेर पडला. आता काय करायचं असा प्रश्न रहिवाशांना पडला. त्यांनी तातडीने हा प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अतुल शर्मा तिथे पोहोचले. त्यांनी सापाला हातात उचलून घेतलं आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

पण साप काही शुद्धीवर येत नव्हता. अखेर शर्मा यांनी सापाला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तोंडाने सापाच्या तोंडात हवा देखील भरली. काही वेळानंतर साप शुद्धीवर आल्याचा दावा रहिवाशांनी केला. अतुल शर्मा यांनी त्याला रेस्कू करत जंगलात सोडून दिलं.

दरम्यान, हा साप बिनविषारी होता. याची अतुल शर्मा यांना कल्पना होती. कारण, त्यांनी सर्पमित्राचं प्रशिक्षण घेतलं होतं. साप बिनविषारी होता म्हणून मी रिस्क घेतली. पण कुणीही असं धाडस करू नका, असं अतुल शर्मा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT