Warakaris perform the first Ringan ceremony around Sant Tukaram Maharaj’s Palkhi in Belwadi, filling the atmosphere with devotion and chants of Mauli Mauli  Saam Tv
व्हायरल न्यूज

माऊली...माऊली! डोळ्यांचं पारणं फेडणारा संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा; पाहा व्हिडिओ

Tukaram Maharaj Palkhi Ringan: बेलवाडीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या रिंगण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मातीच्या रिंगणात वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने भरलेले वातावरण अनुभवण्यासारखे ठरले.

Tanvi Pol

Pandharpur wari 2025: पंढरीच्या वाटेवर लाखो भक्तांच्या मुखी 'माऊली... माऊली!चा गजर कायमच असतो. टाळ-मृदंगाच्या गजरात शिवाय अभंगाच्या लयीत, वारकरी संप्रदायाच्या परंपरेला जागणारा असा हा सोहळा असतो, अशाच भक्तिमय वातावरणात बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या रिंगणात वारकऱ्यांचा भक्तिभाव, पालखीभोवती फिरणारी टाळ-वेगळी दिंड्यांची गर्दी, ढोल-ताशांचा गजर आणि मातीचे उडणारे कण हे सर्व डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.

बेलवाडीतील हे पहिले रिंगण (Ringan Sohala) हे विशेष आकर्षण ठरले. पहाटेपासूनच गावात भक्तांची गर्दी उसळली होती. सनई-चौघड्यांच्या निनादात आणि माऊलीच्या जयजयकारात पालखी बेलवाडीत पोहोचली. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी रिंगणाची तयारी झाली. अगदी काळजीपूर्वक माती सपाट करून भव्य मैदान तयार करण्यात आले होते. रिंगण सुरू होताच वारकऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता.

संत तुकाराम महाराजांची पालखी रिंगणात येताच वातावरण भारावून गेले. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी जोशात आले. त्यांच्या मुखात ज्ञानोबा-तुकाराम, राम कृष्ण हरीचा अखंड जप सुरूच होता. एकीकडे अभंग गायन, तर दुसरीकडे ढोल-ताशांचे सूर, आणि त्याच वेळी रिंगणात वारकऱ्यांची परिक्रम हे सर्व दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

वारकऱ्यांच्या(varkari) दिंड्या रिंगणात उतरताच भक्ती आणि सामूहिकतेचा अप्रतिम संगम दिसून आला. पारंपरिक पोशाखातील वारकरी, पायात माती, ओठांवर विठ्ठलाचे नाम आणि अंत:करणात भक्तीचा झरा वाहणारे हे क्षण रिंगणात पावलोपावली दिसून येत होते.

बेलवाडी ग्रामस्थांनी आणि स्थानिक संस्थांनी या सोहळ्याचे सुयोग्य नियोजन केले होते. रिंगणासाठी स्वतंत्र मैदानाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय मदत केंद्रे, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांची तैनाती इत्यादी गोष्टींमुळे कोणतीही अडचण न होता सोहळा पार पडला. सुरक्षितता आणि स्वच्छतेचा आग्रह राखत रिंगणाला आलेल्या हजारो वारकऱ्यांनी संयम दाखवला. सर्वत्र 'जय जय राम कृष्ण हरी'चा जयघोष सुरू होता. या भक्तिरसात न्हालेलं वातावरण हे गावासाठी गौरवाचे क्षण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

Maharashtra Politics : ठाकरेंसोबत आमदार-खासदार फक्त नावाला, लवकरच भाजपात दिसतील, संकटमोचकाच्या वक्तव्यने राजकीय भूकंपाचे संकेत

TMC पक्ष कार्यालयात नेलं अन् विवस्त्र करून व्हिडिओ..भाजप महिला नेत्याचा गंभीर आरोप; परिसरात खळबळ

अबब! एक वर्षाच्या चिमुकल्याच्या चाव्यानं कोब्रा ठार; VIDEO

SCROLL FOR NEXT