Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लाइव्ह शोमध्ये 'हनीमून'बद्दल विचारलं..., प्रसिद्ध गायिकेने को होस्टच्या लावली कानशिलात, Video व्हायरल

Pakistani Singer Slaps Co Host: लाइव्ह शोमध्ये 'हनीमून'बद्दल विचारताच को होस्टच्या कानशिलात मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Rohini Gudaghe

Latest Viral Video News

प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका शाझिया मंजूर (Shazia Manzoor) हिने एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान होस्टला जोरदार कानशिलात मारली आहे. या घटनेचा व्हि़डिओ व्हायरल झाला आहे. मंजूरने 'पब्लिक डिमांड'वर पाहुणे म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावली होती. लाइव्ह शोमध्ये को होस्टच्या कानशिलात मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला (Viral Video) आहे. (latest viral news)

कार्यक्रमात कलाकार मोहसीन अब्बास हैदरसह (Mohsin Abbas Haider) विनोदी कलाकार आणि सह-होस्ट शेरी नन्हा (Sherry Nanha) हे उपस्थित होते. लाइव्ह शोमध्ये 'हनीमून'बद्दल विचारल्यामुळे गायिका शाझिया मंजूर संतापल्याचं दिसत (viral news) आहे. या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाझिया, लग्नानंतर मी तुला थेट हनीमूनला मॉन्टे कार्लोला घेऊन जाईल. तुला कोणत्या वर्गात जायचे आहे ते, सांगशील का? असं विनोदी कलाकार नन्हाने मस्करीत विचारलं ( Live Show Video Viral) होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे मंजूरचा राग भडकला. त्यांच्यात अनपेक्षित भांडण झाले. तिने नन्हाला त्याच्या अयोग्य टिप्पणीबद्दल ताकीद दिली. गेल्या वेळीही तू असंच वागलास, त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु यावेळी मी गंभीर आहे. तुम्ही महिलांशी असंच बोलता का? असा सवाल शाझिया मंजूरने केला. शोमध्ये चाललेली मस्करी चांगलीच महागात पडली.

हैदरच्या हस्तक्षेपापर्यंत तणाव वाढत गेला. त्याने नन्हाला स्क्रिप्टला धरून राहण्याचं आणि भविष्यात अशा घटना टाळण्याचं आवाहन केलं. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. गायिका शाझिया मंजूर नाराज (Pakistani Singer Slaps Co Host) झाली. गायिका स्टुडिओमधून बाहेर पडली. तिने शोमध्ये परत येण्यास तिची इच्छा नसल्याचं जाहीर केलं.

शाझिया मंजूर हे पाकिस्तानी संगीतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी पार्श्वगायिका म्हणून दर्जा प्राप्त केला आहे. तिच्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, “बतियां बुझाई रख दी,” “चान मेरे मखना” आणि “बल्ले बल्ले” सारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. परंतु शोमधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT