Saam Tv
व्हायरल न्यूज

अरे बापरे! रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीची मगर; पाहताक्षणी नागरिकांचा अडकला श्वास

Crocodile On Road: गुजरातमधील वडोदऱ्यात रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीचा मगर दिसली. नागरिकांची भीतीने धांदल उडाली. वन विभागाने तातडीने दाखल होत सुरक्षितपणे त्याचा रेस्क्यू करून त्याला नदीत सोडले.

Tanvi Pol

Vadodar Viral Video: वडोदरा शहरातील नरहरि ब्रिजजवळील एक अनोखी घटना एका रात्री नागरिकांना पाहायला मिळाली. सुमारे रात्री १० वाजता एका मोठ्या मगरीने शहरातील रस्त्यावर हजेरी लावली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही मगर पावसाळ्यामुळे नदीच्या प्रवाहासोबत भटकत रस्त्यापर्यंत आली होती अशी माहिती पुढे आली आहे.

नरहरि ब्रिजजवळील परिसरात नागरिकांना एका मोठ्या प्राण्याची हालचाल दिसल्यावर त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो प्राणी एक मगर असल्याचं लक्षात आलं. साधारण आठ फूट लांबीची ही मगर रस्त्यावर निवांतपणे फिरत होती. नागरिकांनी घाबरून आपापल्या गाड्या थांबवल्या आणि सुरक्षित अंतरावरून त्याचे फोटो आणि व्हिडिओ(Video) काढण्यास सुरुवात केली. काही जणांनी ही माहिती तत्काळ वन विभागाला दिली.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम आणि प्राणीमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेत, मगरीला जखमी न करता त्याचा सुरक्षितरीत्या रेस्क्यू केली. सुमारे ८ फूट लांबीची असलेली ही मगर पकडण्यात काही अडचणी आल्या, मात्र अनुभवी कर्मचाऱ्यांनी संयमाने ही कारवाई पार पाडली. यानंतर या मगरीला पुन्हा विश्वामित्री नदीत सोडण्यात आले.

वन विभाग आणि प्राणीमित्र संघटनांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटनांमध्ये नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जर कोठेही वन्य प्राणी, विशेषत म्हणजे मगर शहराच्या हद्दीत दिसली तर लगेचच वन विभागाला कळवावे. त्याचबरोबर त्याच्या खूप जवळ जाणे किंवा फोटो काढण्यासाठी रस्ता अडवून गर्दी करणे टाळावे. त्यामुळे प्राण्याला आणि माणसाला दोघांनाही धोका होऊ शकतो.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT