video x
व्हायरल न्यूज

Shocking : ३ वर्षांपासून प्रेमसंबंध! तरुणानं काकीशी थेट पोलीस ठाण्यात केलं लग्न, दोघांचा 'तो' Video Viral

Shocking News : एक तरुण त्याच्या काकीच्या प्रेमात पडला. लपूनछपून त्यांच्या अफेयरची सुरुवात झाली. दोघांनी पोलीस स्थानकामध्ये लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

  • काकी-पुतण्याचे प्रेमसंबंध

  • पोलीस ठाण्यातच केलं लग्न

  • दोघांचा व्हिडीओ व्हायरल

Viral : एका तरुणाने त्याच्या काकीशी लग्न केले आहे. त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुणाच्या काकाने 'मी सर्वस्व गमावले आहे, माझ्याकडे काहीही शिल्लक राहिले नाहीये', असे म्हटले आहे. 'हा माझा पुतण्या आहे, तो माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. पटवाई पोलीस ठाण्यात दबावाखाली हे लग्न झाले आहे. तिने (तरुणाच्या काकीने) स्वत:च्या मर्जीने लग्न केले आहे. आता तिने तिथेच राहावे अशी माझी इच्छा आहे. जर तिला काही झाले, तर त्यात मला ओढू नका', असेही तरुणाच्या काकाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पटवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. एका तरुणाचे त्याच्या काकीशी प्रेमसंबंध होते. तिला भेटण्यासाठी हा तरुण घराच्या भिंतीवरुन उडी मारत येत असे. त्याच्या काकाला याची माहिती नव्हती. पण हळूहळू गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रेमप्रकरणाची माहिती तरुणाच्या काकाला समजली. जाब विचारताच मला पुतण्यासोबत राहायचे आहे, असे तरुणाच्या काकीने म्हटले.

प्रेमसंबंधांमुळे कुटुंबाला धक्का बसला. तरुणाच्या काकीने पोलीस ठाण्यात पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 'माझ्याशी लग्न केलं नाही, तर तुरुंगात जाशील' अशी पुतण्याला धमकीही दिली. त्यानंतर पोलिसांनी पुतण्याला पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी पुतण्याला तिच्या गळ्यात हार घालायला आणि कूंकू लावायला सांगितले. घटस्फोट न घेता काकीने पुतण्याशी लग्न केले.

'३ वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. याची मला माहिती नव्हती. मी गाडी चालवतो, माझा पुतण्याही गाडी चालवतो. ते दोघे एकमेकांशी गुपचूप बोलत राहिले. जेव्हा हे सर्वांसमोर आले, तेव्हा माझी पत्नी म्हणाली तिला पुतण्यासोबत राहायचे आहे. तो भिंतीवरुन उडी मारुन तिला भेटायला यायचा. त्याला शेजाऱ्यांनी पाहिले होते. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. माझ्या पत्नीने पुतण्यासह कुटुंबातील सहा सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केले', असे तरुणाच्या काकाने म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: डेटा कधीही संपणार नाही! Jioचा धमाकेदार २०० दिवसांचा Unlimited 5G प्लॅन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, २ जणांचा मृत्यू

Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CTTV व्हिडिओ समोर

माजी मंत्र्यांच्या नातवाचा पाय खोलात; भाजप नेत्याकडून पैसे थकवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

SCROLL FOR NEXT