Cow Baby Shower Video Saam TV
व्हायरल न्यूज

Cow Baby Shower Video: काय सांगता! शेतकऱ्याने चक्क गाईचं केलं डोहाळे जेवण; पंचक्रोशीत चर्चा, VIDEO व्हायरल

Cow Baby Shower Viral Video: एका शेतकऱ्याने आपल्या गाईचं साजरं संगित करत डोहाळे जेवण केलंय.

Ruchika Jadhav

Viral Video:

लग्नातील फोटोशूट प्रमाणे आजकाल सर्वत्र डोहाळे जेवणाचेहे जंगी फोटोशूट आणि सेलिब्रेशन होते. होणारी आई या दिवशी सर्वात जास्त आनंदी असते. अशात तुम्ही कधी एखाद्या गायीचं डोहाळे जेवण केलेलं ऐकलंय का? एका शेतकऱ्याने आपल्या गाईचं साजरं संगित करत डोहाळे जेवण केलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अनोख्या डोहाळे जेवण कार्यक्रमाला नातेवाईक पाहुणे आणि गावकऱ्यांचा पाहुणचार करण्यात आलाय. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील बाभळी येथील शेतकरी चांदराव नरवाडे यांना पशू पालनाची आवड आहे. नरवाडे यांनी आपल्या गाईचे डोहाळे जेवण दिलेय.

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी गाईला सजवण्यात आलं. एखाद्या महिलेला आई होण्याआधी जसं सजवलं जातं अगदी तसंच या गायीला सजवण्यात आलंय. तिची खणा नाराळलाने ओटी भरण्यात आलीये. तसेच शिंगे रंगवण्यात आलीत. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेलेत.

गाईचे डोहाळे जेवण शेतकऱ्याने एखाद्या लग्नासारखे केले आहे. यात लोकांच्या पगंती बसल्या. गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला आणि ओटीपूजन केले. डोहाळे जेवणाचे गाणे देखील महिलांनी गायीले.सध्या पंचक्रोशीत या डोहाळे जेवण कार्यक्रमाची चर्चा आहे.

अनेक व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यांवर अगदी मुलांसरखं प्रेम करतात. त्यांना हवं नको त्या सर्व गोष्टी पुरवतात. तसेच जनावरांवर माया आणि प्रेमही करतात. याच प्रेमापोटी आपल्या गाईचं डोहाळे जेवण करावं, असं या शेतकऱ्याला वाटलं आणि त्यांनी गायीचं डोहाळेजेवण घातलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT