Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: नागालँडचे मंत्री चिखलात पडले आणि रुतून बसले; बाहेर काढण्यासाठी थेट जेसीबी बोलावली

Viral Post: भाजप नेते आणि नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagaland Minister Viral Post

सेलिब्रेटीपासून ते राजकारणात असलेला प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्याच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी बऱ्याच वेळा आपल्या चाहत्यावर्गा सोबत शेअर करतात. अनेकवेळा ते त्यांच्या जीवनातील गमतीदार गोष्टी तर कधी कधी काही घटना सांगत असतात,त्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. अशातच भाजप नेते आणि नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होतेय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग हे त्यांच्या विनोदी स्वभावासाठी ओळखले जातात. मंत्री तेमजेन अलॉन्ग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यात त्यांनी स्वत:हा एक्स(ट्वीटर)वर एक गमतीदार व्हिडिओ पोस्ट केला आहे,ज्यात ते एका तलावात अडकलेले दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, मंत्री तेमजेन अलॉन्ग हे एका तलावता अडकलेले आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. या चिखलातून ते बाहेर निघण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. तरी देखील त्यांना बाहेर निघण्यात यश येत नाही.मात्र मंत्री तेमजेन अलॉन्ग यांच्या मदतीसाठी काही व्यक्ती सोबत दिसून येत आहेत परंतु त्या व्यक्तींची पूर्ण मदत न घेता ते तलावातून बाहेर येण्यात यशस्वी होतात आणि तलावाच्या काठावर असलेल्या एका खुर्चीवर जाऊन बसतात.

सोशल मीडिया एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'आज एक जेसीबी परिक्षा होती!टीप-हे सर्व NCAP रेटिंगबद्दल आहे,कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने NCAP रेटिंग तपासा. कारण की ही तुमच्या आयुष्याची गोष्ट आहे'.

एक्सवरील या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केल्या आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'जीवन असेल तर जग आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की'भारीच'.आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT