Bharat NCAP : कार क्रॅश चाचणी कशी आणि किती वेळा केली जाते? वाचा सविस्तर

Car Crash Test : केंद्रीय मंत्री नितिनल गडकरी यांनी नुकतीच घोषणा केली आहे की भारत NCAP क्रॅश चाचणी कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
Bharat NCAP
Bharat NCAPSaam Tv
Published On

Car Asessment Program : वाहनांची मजबूती तपासण्यासाठी आतापर्यंत ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश चाचण्या केल्या जात होत्या परंतु आता वाहनांची क्रॅश चाचणी भारतातही केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितिनल गडकरी यांनी नुकतीच घोषणा केली आहे की भारत NCAP क्रॅश चाचणी कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. सरकारच्या या घोषणेनंतर आता अनेक मोठे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत.

क्रॅश चाचणी कशी केली जाते, क्रॅश चाचणी दरम्यान किती कॅमेरे बसवले जातात आणि क्रॅश चाचणी किती वेळा केली जाते हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

Bharat NCAP
Car Asessment Program : आता होणार देशाची स्वदेशी कार क्रॅश चाचणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सादर केली भारत एनसीएपी

कार क्रॅश चाचणी कशी केली जाते?

चाचणी कशी केली जाते हा प्रश्न जाणून घेण्यापूर्वी, क्रॅश चाचणी म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे? कोणतीही कार किती मजबूत असते आणि गाडी (Vehicle) चालवताना गाडीत बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतात? तीच गोष्ट शोधण्यासाठी क्रॅश टेस्टिंग केली जाते. क्रॅश टेस्टिंग दरम्यान, जेव्हा कार बॅरियरला आदळते, त्यानंतर कारच्या बाहेरील आणि आतील भागांची कसून तपासणी केली जाते आणि नंतर कारला रेटिंग दिले जाते.

क्रॅश चाचणी दरम्यान वेग किती आहे?

ग्लोबल एनसीएपी चाचणी दरम्यान, कार 64 किमी प्रतितास वेगाने चालविली जाते, निर्दिष्ट वेगाने धावल्यानंतर, कार समोर असलेल्या बॅरियरला धडकते. क्रॅश चाचणीमध्ये, प्रौढ आणि बाल संरक्षणानुसार वेगवेगळी रेटिंग दिली जाते.

BNCAP चाचणीबद्दल बोलताना, भारतातील फ्रंट ऑफसेट चाचणीचा वेग देखील 64 किमी प्रतितास असेल, साइड इफेक्ट चाचणी 50 च्या वेगाने केली जाईल आणि पोल साइड इफेक्ट चाचणी 29 किमी प्रतितास वेगाने केली जाईल. भारत सरकारच्या नवीन सुरक्षा नियमांनुसार, वाहनांना साइड इफेक्ट आणि फ्रंट ऑफसेट क्रॅश चाचण्या दोन्ही पूर्ण करणे बंधनकारक असेल.

Bharat NCAP
Safest Cars : Bharat NCAPकडून होणार या 5 कार्सची चाचणी, पाहा देशातली सर्वात सेफ कार कोणती?

गाडीत कोण बसते आणि किती कॅमेरे आहेत?

ज्या वेळी कारचे (Car) क्रॅश टेस्टिंग केले जाते, त्या वेळी कारमध्ये बसण्यासाठी डमी मॉडेल बनवले जातात. चाचणी दरम्यान किती कॅमेरे बसवले आहेत, आतापर्यंत कॅमेऱ्यांच्या संख्येबाबत कोणतीही अचूक आकडेवारी समोर आलेली नाही, परंतु चाचणीदरम्यान 8 ते 10 कॅमेरे वेगवेगळ्या कोनातून कार टिपतात, असे अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

5 स्टार रेटिंगसाठी किती गुण आवश्यक आहेत?

ग्लोबल एनसीएपीकडे चाचणीसाठी वेगळा प्रोटोकॉल आहे, तर भारत एनसीएपीकडे वेगळा प्रोटोकॉल असेल. कारला GNCAP चाचणी दरम्यान प्रौढ संरक्षणामध्ये 34 गुण, समोरच्या क्रॅश चाचणीमध्ये 16 गुण, साइड इफेक्ट चाचणीमध्ये 16 गुण आणि 5 स्टार सुरक्षा रेटिंगसाठी सीटबेल्ट रिमाइंडरमध्ये 2 गुण मिळणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, BNCAP मध्ये, कोणत्याही कारला 5 स्टार रेटिंग मिळवण्यासाठी प्रौढ संरक्षणात किमान 27 गुण आणि बाल संरक्षणात किमान 41 गुण मिळवावे लागतात. क्रॅश चाचणी दरम्यान फ्रंट ऑफसेट, साइड इफेक्ट आणि पोल साइड इफेक्ट तपासले जातात.

Bharat NCAP
Car Crash Test: आता भारतातच होणार क्रॅश टेस्ट, स्वदेशी सेफ्टी रेटिंग BhartNCAP मंगळवारी होणार लॉन्च

सीएनजी-ईव्हीचीही चाचणी केली जाईल

आतापर्यंत सीएनजी आणि इलेक्ट्रिक (Electric) वाहनांची क्रॅश चाचणी केली गेली नाही परंतु बीएनसीएपी या मॉडेल्सचीही चाचणी करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वाहनांची क्रॅश चाचणी एकदाच केली जाते, कारण ही संपूर्ण प्रक्रिया खूपच महाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com