Car Crash Test: आता भारतातच होणार क्रॅश टेस्ट, स्वदेशी सेफ्टी रेटिंग BhartNCAP मंगळवारी होणार लॉन्च

आता भारतातच होणार क्रॅश टेस्ट, स्वदेशी सेफ्टी रेटिंग BhartNCAP मंगळवारी होणार लॉन्च
BhartNCAP
BhartNCAPSaam Tv
Published On

BhartNCAP: भारत एनसीएपी ही बहुप्रतिक्षित नवी कार सुरक्षा मूल्यांकन व्यवस्था, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 22 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करणार आहेत. ही व्यवस्था म्हणजे भारतात 3.5 टनांपर्यंतच्या मोटर वाहनांचे सुरक्षा मानक वाढवून, रस्ता सुरक्षेत वाढ करण्यास मदत करणार आहे.

बाजारात उपलब्ध असलेल्या मोटार वाहनांच्या अपघात प्रतिबंधक सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी, कार ग्राहकांना एक माध्यम उपलब्ध करुन देणे हा या व्यवस्थेचा उद्देश आहे. या अंतर्गत, कार उत्पादक स्वेच्छेने, मोटार-वाहन उद्योग मानक (एआयएस) 197 नुसार आपल्या कार/वाहनांची चाचणी करुन, बाजारात विक्रीसाठी आणू शकतात.

BhartNCAP
Fixed Deposit Scheme: एफडीवर ही बँक देत आहे सर्वाधिक 9.10 टक्के व्याज, इतक्या दिवसांची करावी लागेल गुंतवणूक...

चाचण्यांमध्ये कार/वाहनाने बजावलेल्या कामगिरीच्या आधारावर, कारला अॅडल्ट ऑक्युपन्ट्स (AOP) आणि चाइल्ड ऑक्युपंट्स (COP) अशी, बाल किंवा प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेली स्टार मानांकने दिली जातील. या मानांकनांच्या आधारावर, कार ग्राहक वेगवेगळ्या वाहनांच्या सुरक्षा मानकांची तुलना करुन त्यानुसार, कोणते वाहन खरेदी करायचे याबाबत निर्णय घेऊ शकतील.  (Latest Marathi News)

या प्रणालीमुळे सुरक्षित वाहनांची मागणी वाढेल आणि ग्राहकांची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कार उत्पादक सुद्धा अशाच वाहनांचे उत्पादन वाढवतील, अशी अपेक्षा आहे.

BhartNCAP
Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 115 महिन्यांत पैसे होणार दुप्पट; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

वाहनांच्या दर्जेदार सुरक्षा मानकांमुळे भारतीय बनावटीच्या कार जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या दृष्टीने परदेशी कारच्या तोडीस तोड कामगिरी बजावतील आणि त्यामुळे भारतातल्या कार उत्पादकांची कारनिर्यात क्षमता सुद्धा वाढून, भारताची एकंदर कार निर्यात वाढेल. या प्रणालीमुळे भारतात सुरक्षा केंद्रस्थानी मानून कार/वाहन निर्मिती करणारी बाजारपेठ विकसित होणे अपेक्षित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com