Mumbai Local Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local: काय तो उत्साह, काय ती एनर्जी! मुंबई लोकलमध्ये महिलांची धम्माल होळी, गाणी आणि गुलालाची उधळण

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मात्र त्यात पुन्हा एकदा भर पडली ते म्हणजे मुंबई लोकल ट्रेनमधील अनोख्या व्हिडिओची. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Holi Celebration In Mumbao Local: मुंबई लोकल म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नाही तर, मुंबईकरांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लोकल ट्रेनमधील गर्दी, प्रवाशांची गजबज आणि धावपळीचे जीवन या सर्वांमध्ये मुंबईकर सण-उत्सावांचा आनंद घेण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. सध्या यंदा होळीच्या निमित्ताने काही महिला प्रवाशांनी ट्रेनमध्येच जल्लोष सादरा केलेला आहे. ह्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

होळीचा रंग लोकलमध्येच!

होळी(Holi) हा रंगांचा सण आहे! हा सण घरी किंवा गल्लीत साजरा करण्या ऐवजी महिलांनी तो चक्क लोकल ट्रेनमध्येच साजरा केला आहे. ज्यात महिलांनी चक्क होळीची गाणी गात आणि रंगांची उधळण करत जोरदार सेलिब्रेशन केले आहे. ट्रेनमधील महिलांचा हा जल्लोष पाहून इतर प्रवाशी अतिशय खुष झालेले आहेत.

लोकल ट्रेनमधील (Local Train) हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या ''madhu.bala1732'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूजही दिलेले आहेत.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या रंगीबेरंगी क्षणांचा व्हिडिओ प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यातील अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत,''महिला काहीही करु शकतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''एकदम भारी''अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळाल्या.

टीप: मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

SCROLL FOR NEXT