Women Fight in Local Train Saam tv
व्हायरल न्यूज

Women Fight in Local Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांची दे दणादण, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...; व्हिडिओ व्हायरल

Women Fight in Local Train : महिला प्रवाशांनी एकमेकींच्या झिंज्या उपटून हाणामारी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Women Fight in Local Train

मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये जागा आणि धक्का लागण्यावरून प्रवाशांचे भांडणे आणि हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशीच एक हाणामारीची घटना लोकल ट्रेनच्या लेडिज डब्यात घडली आहे. महिला प्रवाशांनी एकमेकींच्या झिंज्या उपटून हाणामारी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. महिला प्रवाशांच्या झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. या महिला प्रवासी सुरुवातीला एकमेकांशी भांडताना दिसत आहे.

लोकल ट्रेनच्या डब्यात जोरदार भांडण केल्यानंतर दोन्ही महिला हाणामारी करायला सुरुवात करतात. एक प्रवासी महिला दुसऱ्या महिलेला हाताने मारते. त्यानंतर दोन्ही महिला प्रवासी एकमेकींच्या केस ओढून हाणामारी करायला सुरुवात करतात. त्यानंतर आजूबाजूचे महिला प्रवासी यांचं भांडण सोडवतात. या दोन्ही प्रवासी महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .

दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ कोणत्या रेल्वे मार्गावरील आहे, याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मुंबई मॅटर्स या 'एक्स' अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, 'मुंबई लोकल ट्रेनच्या लेडिज डब्ब्यावर लवकरच एक वेब सीरीज पाहायला मिळेल. एक क्षणासाठी मला वाटलं की, एखादी कुस्तीचा सामना पाहत आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT