kalyan News
kalyan NewsSaam tv

kalyan News: लोकल ट्रेनमध्ये चढताना महिला पडली; रेल्वे पोलीसाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

लोकल ट्रेनमध्ये चढताना महिला पडली; रेल्वे पोलीसाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण
Published on

अभिजित देशमुख
कल्याण
: प्लॅटफॉर्मवर आलेली लोकल ट्रेन धाकली. यावेळी ट्रेन सुटेल यामुळे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा (Kalyan) प्रयत्न महिला करत होती. ट्रेनमध्ये चढताना महिलेचा हात निसटला आणि ती प्लॅटफॉर्मवर पडली. यावेळी काही प्रवाशी व रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचले आहेत. (Latest Marathi News)

kalyan News
Amravati News : ८ महिन्यात ७३७ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; अमरावती विभागातील धक्कादायक चित्र

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर आलेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला हात निसटून लोकलच्या खाली प्लॅटफॉर्मवर तोल जाऊन पडली. याचवेळी प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्म वर खेचले. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला.

kalyan News
Nandurbar News: ज्वलनशील पावडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग; मोठा अनर्थ टळला 

सीसीटीव्हीत थरार कैद 

रेल्वेतून महिला पडल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. ऋषिकेश माने असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. माने यांच्या कर्तव्यदक्ष व प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com