Amravati News : ८ महिन्यात ७३७ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; अमरावती विभागातील धक्कादायक चित्र

८ महिन्यात ७३७ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; अमरावती विभागातील धक्कादायक चित्र
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: पावसाचा लहरीपणा यामुळे नापिकी होते. यातून वाढणारा कर्जाचा बोजा, या विवंचनेत शेतकरी (Farmer) असतो. यातून टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असतो. याच कारणातून (Amravati) अमरावती विभागात जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यात तब्बल ७३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Breaking Marathi News)

Amravati News
St Bus Accident: बस-दुचाकी अपघातात एक ठार; दुचाकीला वाचविताना बस खड्ड्यात

अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला या पाच जिल्ह्याच्या शेतकरी आत्महत्याच्या या आकडेवारीने मात्र चिंता वाढली आहे. यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. यवतमाळ व बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाही. यामुळे शेतकरी संकटात आहे. 

Amravati News
Bodwad Heavy Rain: बोदवड तालुक्यात जोरदार पाऊस; लोणवाडी परिसरात घरात शिरले पाणी

अमरावती जिह्यात सर्वाधिक आत्महत्या 

पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरम्यान अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मागील वर्षी एकट्या अमरावती जिल्ह्यात ३४८ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com