Mumbai Local Train Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Viral Video: महिला मंडळाचा नादच खुळा; लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना दिली भन्नाट नावे, वाचून म्हणाल...

Mumbai Local Train Viral Video: ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या महिलांनी लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना भन्नाट नावे दिल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

Mumbai Local Train Video: मुंबई आणि नजीकच्या परिसरातील बहुतेक पुरूष असो किंवा महिला प्रवासी रोज ऑफिसला जाण्यासाठी लोकल ट्रेनचाच वापर करतात. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आठवड्यातील एक दिवस सुटी सोडली तर ट्रेनने रोजच ये-जा होत असते. या रोजच्या आणि त्यात लांब पल्ल्याचा प्रवासामुळे ट्रेनमध्ये अनेकांसोबत ओळखी होतात.

त्यात विशेष म्हणजे पुरुषांसारखा रोज प्रवास करणाऱ्या बहुतेक महिला प्रवाशीही ट्रेनमध्ये ठरलेल्या ग्रुपसोबतच प्रवास करतात. याच ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या महिलांनी लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना भन्नाट नावे दिल्याचे समोर आलं आहे. (Latest Marathi News)

मुंबईची लोकल ट्रेन म्हटलं तरी अनेकांसाठी लाईफलाईनच असते. रोजचा प्रवासी कामाला जाताना खेळी-मेळीच्या वातावरणात प्रवास करतो. या लोकल ट्रेनमधील अनेक रंजक व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लहरी प्रवासी गाणेही गातात. तर काही डान्स देखील करतात. यामुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांचं चांगलंच मनोरंजन होत असतं.

ट्रेनमध्ये गर्दी असो किंवा नसो रोजचा एकत्र प्रवास करणारे मंडळी आनंदात प्रवास करत जात असतात. तर लोकल ट्रेनमध्ये अनेकदा प्रवाशांची जोरदार कडाक्याची भांडणे, हाणामारी देखील होते. या अशा नानाविविध विषयांमुळे मुंबई लोकल ट्रेनची चौफेर चर्चा होत असते.

कर्जत,बदलापूर , पनवेल, वसई-विरारमध्ये राहणाऱ्या महिला देखील मोठ्या संख्येने नोकरीसाठी मुंबईला जात असतात. गर्दी असो , पाऊस असो या भागातील महिला जबाबदारीने नोकरीसाठी घराबाहेर पडताना दिसतात. रोज प्रवास करणाऱ्या या महिलांनी लोकल ट्रेनच्या डब्ब्यांना भन्नाट नावे दिली आहेत. इन्स्टाग्राम युजर सोनल सुर्वे नावाच्या तरुणीने रील करत याबद्दल माहिती दिली आहे. बदलापूरच्या सोनलचा रील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सोनलने या रीलमधून रोजची ठरलेली ट्रेन, ट्रेनमधील ग्रुप, ट्रेन पकडण्यासाठीची धावपळ या विषयी मोजक्या शब्दात सांगितलं आहे. तसेच तिने कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच तिच्या काकींनी ट्रेनच्या डब्ब्यांना दिलेली नावे देखील सांगितली.

महिला ट्रेनच्या पहिल्या डब्ब्याला किचन, मधल्या डब्ब्याला बेडरूम तर शेवटच्या ऐसपैस डब्ब्याला हॉल म्हणतात. आपण कोणत्या डब्ब्यात आहोत, हे पटकन दुसऱ्या प्रवाशांना समजावं, यासाठी महिलांनी डब्ब्यांचं नामकरण केलं आहे., अशी माहिती सोनलने रीलमधून दिली आहे. इन्स्टाग्रामवर सोनलले शेअर केलेले रील भन्नाट आहे. सोनल अनेक वेगवेगळ्या माहितीपूर्ण विषयांवर रील बनवत असते.

सोनलच्या रीलवर तिच्या अनेक इन्स्टाग्राम युजर मित्रांनी भन्नाट कमेंट्स करत लोकल ट्रेनच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिच्या रीलवर एका युजरने म्हटले आहे की, डोंबिवलीतील गर्दीची गोष्टच निराळी...म्हणून कॉलेजला जाण्यासाठी एकतर कोपर स्टेशनला, नाही तर कल्याणला जाऊन ट्रेन पकडायचो. फारच सुंदर प्रवासवर्णन'

तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, खूप भारी आठवणी जाग्या झाल्या'. सोनलचा रील व्हिडिओ आतापर्यत हजारो जणांनी पाहिला आहे. तर सहा हजारांहून अधिक जणांनी लाईक केला आहे. तर एक हजारांहून अधिक जणांनी शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पराभूत उमेदवारांच्या बैठकीनंतर आता मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू

Rohit Sharma: पर्थ टेस्टदरम्यान अचानक रोहित शर्माची एन्ट्री; चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Best Parenting Tips: तुम्ही मुलांना सतत ओरडता? मुलं तुमचेच ऐकतील, 'या' टीप्स करा फॉलो

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

Pravin Tayade News : वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं झालं; बच्चू कडुंचा पराभव करणाऱ्या तायडेंनी व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT