Mumbai Local Train Video Saam TV
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Video: मुंबई लोकलमधून तरुणाचा जीवघेणा प्रवास; ऑफिसला पोहोचण्यासाठी दोन्ही डब्ब्यांमध्ये लटकला, खतरनाक VIDEO

Ruchika Jadhav

Mumbai Local Train Viral Video:

मुंबई लोकल ट्रेन म्हणजे रोजची घाई गडबड आणि धकाधकीचं जीवन. लोकल ट्रेनने प्रवास करताना नेहमीच गर्दी पाहायला मिळते. वेस्टर्न किंवा हार्बर लाईनपेक्षा जास्त गर्दी ही सेंट्रल लाईनला असते. मुंबई लोकलमधील गर्दीचे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. अशात सध्या याच प्रवासाचं भीषण वास्तव समोर आणणारा एक व्हिडीओ समोर आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येक चाकरमानी आपल्या गर्दीशी सामना करतो. ट्रेनच्या क्षमतेपेक्षा 10 पट जास्त नागरिक एकाचवेळी ट्रेनने प्रवास करतात. अशात प्रवासात बऱ्याचदा ट्रेन लेट होते. ट्रेनला उशिर झाला की गर्दी वाढते. मग या गर्दीमुळे अनेकांना ट्रेनमध्ये चढता येत नाही. परिणामी ऑफिसला पोहचण्यास पुन्हा उशिर होतो.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुंबईकर (Mumbai) जीव मुठीत घेऊन कसे प्रवास करतात याचं वास्तव मांडण्यात आलं आहे. लोकल ट्रेनमध्ये अनेकजण दरवाजाला लटकले आहेत. आता एका तरुणाला दरवाजाला लटकण्यासाठी देखील जागा नाहीये. त्यामुळे याने थेट ट्रेनच्या दोन डब्ब्यांमध्ये असलेल्या जागेला लटकून जाण्याचा निर्णय घेतला.

ऑफिसला पोहचायला उशिर झाला तर बॉस ओरडणार, लेट मार्क लागणार, पगार कट होणार असे अनेक प्रश्न मनात घेऊन हा तरुण येथे लटकून प्रवास करतो आहे. जीव धोक्यात टाकून केलेल्या या प्रवासाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.

मुंबई लोकल ट्रेनचा हा पहिलाच व्हिडीओ नाही. याआधी देखील नाविलाज म्हणून अनेकजण अशा पद्धतीने प्रवास करतात. यात काही स्टंटबाजी करणारे देखील असतात. मात्र बरेच जबाबदारीचं ओझं घेऊन प्रवास करतात. @_aamchi_mumbai या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

अनेक तरुण सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी फेम मिळवण्यासाठी मेट्रो तसेच मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Train) विचित्र रील व्हिडीओ बनवतात. असं करणाऱ्या तरुणांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीमधील तरुण व्हायरल होण्यासाठी नाही, तर पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात टाकून प्रवास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT