Dr. Prafull Srivastava caught on camera falling into a pit during a temple event in MP, sparking a wave of laughter online. Viral Video
व्हायरल न्यूज

फोटोच्या चक्करमध्ये ६ फूट खड्ड्यात कोसळला डॉक्टर, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

मध्य प्रदेशात मंदिर पायाभरणीच्या कार्यक्रमात फोटो घेताना डॉक्टर प्रफुल्ल श्रीवास्तव सहा फूट खड्ड्यात कोसळले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Viral Video Sparks Laughter : आपण करत असलेले काम समाजमाध्यमांवर दाखवण्याची हौस अनेकांना असते. प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियावर टाकतात. त्यासाठी एखाद्या कामाचे, मदतीचे फोटोशूट केले जाते. पण फोटो, व्हिडिओ काढताना अनेकांची पंचायत होते अन् हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद होतो. असाच एक प्रसंग कॅमेऱ्याद कैद झाला, मंदिराच्या पायाभरणीवेळी डॉक्टरला फोटोशूट करायचं होतं, पण त्यांचं हसं झालं. होय,.. फोटो काढताना डॉक्टर सहा फूट खोल खड्ड्यात कोसळले. मध्य प्रदेशणधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्हायत मंदिराच्या पायाभरणीवेळी श्रमदान करतानाचा हा व्हिडिओ असल्याचे माहिती मिळतेय. सहा फूट खोल खड्ड्यात पडलेल्या डॉक्टरांचे नाव प्रफुल्ल श्रीवास्तव असे आहे. सिमेंटची पाटी घेऊन फोटो काढताना डॉक्टरांचा पाय घसरला अन् ते थेट सहा फूट खोल खड्ड्यात पडल्याचे व्हिडिओत दिसतेय. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. काही नेटकऱ्यांनी डॉक्टरांवर निशाणा साधलाय.

पाहा व्हायरल होणारा व्हिडिओ

प्रफुल्ल श्रीवास्तव हे श्रमदान करत होते. त्यावेळी सिमेंट काँक्रीटच्या खड्ड्यात पडले, तेही फोटो काढण्याच्या चक्करमध्ये. हा सर्व प्रसंग एका कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सिमेंटची पाटी घेऊन डॉक्टर फोटो काढणार होते, पण ते सहा फूट खोल खड्ड्यात पडले. त्यांना किरकोळ जखम झाली, पण त्यांचे हसू झाले नाही. हा व्हिडिओ मध्य प्रदेश अन् भारतात वाऱ्यासारखा व्हायरल झालाय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. चित्रगुप्त मंदिराच्या पायाभरणी वेळी मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. डॉ प्रफुल्ल श्रीवास्तव चित्रगुप्त मंदिरच्या जीर्णोद्वार समितीचे अध्यक्ष आहे. सकाळी ते पूजा करण्यासाठी मंदिरात पोहचले होते., त्यावेळी कॉलमचे काम सुरू होते. त्या वेळी मजूराच्या मदतीसाठी ते गेले. प्रफुल्ल यांना एका मजूराने सिमेंटने असलेली पाटी हातात दिली. त्याचवेळी त्यांचा तोल केला अन् सहा फूट खड्ड्यात पडले. त्यांनी किरकोळ जखमी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT