Viral Video  saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम; लोक लांबच लांब रांगेत ताटकळत उभे, व्हिडिओ व्हायरल

mount everest Viral Video : माऊंट एव्हरेस्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोकांची एकच सरळ रांग दिसत आहे. व्हिडिओ इन्टाग्रामवरही प्रचंड व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखराव चढणे अनेकांसाठी स्वप्न असतं. एव्हरेस्ट शिखरावर चढण्यासाठी निघालेल्या अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. मागच्या आठवड्यात पाच गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याचदरम्यान माऊंट एव्हरेस्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माऊंट एव्हरेस्टवरील व्हायरल व्हिडिओमध्ये शेकडो लोक एकमेकांच्या सहकार्याने शिखरावर उभे राहिल्याचे दिसत आहेत. सर्व गिर्यारोहक हळूहळू पुढे सरकत आहेत. एव्हरेस्टवरील हे दृश्य पाहून येथेही ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसत आहे.

माऊंट एव्हरेस्टवरील हा व्हिडिओ राजन द्विवेदी यांनी शेअर केला आहे. मागील १० वर्षांपासून माऊंट एव्हरेस्ट शिखर चढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राजन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. शिखरावर लोक मोठ्या अडचणीचा सामना करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

एव्हरेस्टवरील हा व्हिडिओ इन्स्टाग्रामरही व्हायरल होत आहे. शेकडो गिर्यारोहक शिखरावर एका रांगेत उभे आहेत. सर्व गिर्यारोहक सरळ एका रांगेत उभे आहेत. राजन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गिर्यारोहक खाली उतरताना दिसत आहे.

राजन द्विवेदी यानी २१ मे रोजी त्यांच्या एव्हरेस्ट मिशनविषयी एक अपडेट शेअर केलं. या व्हिडिओमध्ये सर्व गिर्यारोहक एका रांगेत उभे आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावर प्रचंड झोप आल्याचे दिसत आहेत. अनेकांचे अंग थरथर कापत आहेत. तर काही जण रडत आहेत. त्यामुळे शिखरावर मोठी रांग लागली आहे. यातील अनेकांना शिखरावर चढाई करण्याचा अनुभव नाही. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय शिखरावर चढण्याचा इच्छा असणाऱ्या लोकांसाठी विचार करण्यास भाग लावणार व्हिडिओ आहे.

ब्रिटिश लेखक इयान कॅमरून यांनी म्हटलं की, एव्हरेस्टवर चढाई करणे एक साहसी भांडवलशाहीचा एक खराब प्रकार आहे. 'एव्हरेस्टवर चढाई करणे माझ्या यादीत नाही, असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करत कॅमरुन यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT