Uttar Pradesh Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking: पाठीमागून मिठी मारली, छातीला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत भयंकर घडलं; CCTV व्हिडीओ व्हायरल

Uttar Pradesh Shocking Video: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. एका महिलेला तरुणाने भररस्त्यात मिठी मारली आणि तिच्या शरीराला वाईट पद्धतीने स्पर्श केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

Summary -

  • मुरादाबादमध्ये मुस्लिम महिलेचा रस्त्यावर विनयभंग करण्यात आला.

  • एका तरुणाने पाठीमागून येऊन या महिलेला मिठी मारली आणि वाईट पद्धतीने छातीला स्पर्श केला.

  • या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • पोलिस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेसोबत तरुणाने अश्लिल कृत्य केले. महिलेला या तरुणाने पाठीमागून येऊन मिठी मारली. त्याने या महिलेच्या शरीराला वाईट पद्धतीने स्पर्श करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर या तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुरादाबादमध्ये बुरखा घातून एक मुस्लिम महिला रस्त्यावरून एकटी चाललेली असते. त्याचवेळी पाठी मागून एक तरुण येतो. हा तरुण या महिलेला पाठीमागून जोरात मिठी मारतो, तिच्या छातीला वाईट पद्धतीने स्पर्श करतो, तिला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. काही सेकंद हा तरुण या महिलेसोबत हे भयंकर कृत्य करतो. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढतो. पीडित महिला पाठीमागे वळून हा तरुण नेमका कोण आहे हे पाहते तोपर्यंत तो फरार झालेला असतो. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. दिवसाढवळ्या हा तरुण महिलेसोबत हे भयंकर कृत्य करतो ही खूपच वाईट गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एका नेटकऱ्याने सांगितले की, 'दिवसाढवळ्या अशा गोष्टी घडत आहेत. तर महिला सुरक्षेची काय गॅरंटी आहे?' हे प्रकरण यासाठी संवेदनशील मानले जात आहे कारण पीडित महिला मुस्लिम समाजातील आहे. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

ही घटना मुराबाद जिल्ह्यातील शहरी भागातील आहे. पोलिसांनी अद्याप या ठिकाणाविषयी अधिकृत माहिती दिली नाही. मुराबाद पोलिस या व्हायरल व्हिडीओद्वारे आरोपीचा शोध घेत आहेत. ते आरोपीच्या शोधासाठी घटनास्थळाच्या आसपासच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत. पीडित महिलेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT