Beed Crime: शाळकरी मुलीला कारमध्ये कोंबलं, विनयभंग करत बेदम मारलं; बीडमधील भयंकर घटना

Beed Police: बीडमध्ये शाळकरी मुलीचे अपरहण करून तिचा विनयभंग करण्यात आला. आरोपींनी या मुलीला बेदम मारहाण देखील केली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली.
Beed Crime: शाळकरी मुलीला कारमध्ये कोंबलं, विनयभंग करत बेदम मारलं; बीडमधील भयंकर घटना
Beed CrimeSaam Tv
Published On

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपरहण करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या शाळकरी मुलीचे तिघांनी अपरहण केले. तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून नेलं आणि तिचा विनयभंग करण्यात आला. आरोपी ऐवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या मुलीला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण देखील केली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घरात होती. त्याचवेळी आरोपी तिथे आले. त्यांनी तिला जबरदस्ती कारमध्ये बसवले आणि कारमध्येच तिचा विनयभंग केला. आरोपींनी पीडित मुलीला पाईपने जबरदस्त मारहाण देखील केली. तसंच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर पीडित मुलीला सोडून देण्यात आले.

Beed Crime: शाळकरी मुलीला कारमध्ये कोंबलं, विनयभंग करत बेदम मारलं; बीडमधील भयंकर घटना
Beed : कृष्णा आंधळेचा खून, वाल्मिक कराडने २५ जणांची हत्या केली, माझ्याकडे पुरावे; बडतर्फ पीएसआयचा खळबळजनक दावा

या घटनेनंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली. तिने आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगितले. तर त्यांनी तिला घेऊन नेकनूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींविरोधात अपहरण, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या तिन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Beed Crime: शाळकरी मुलीला कारमध्ये कोंबलं, विनयभंग करत बेदम मारलं; बीडमधील भयंकर घटना
Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. कधी मारहाण, कधी कुणाचे अपरहण, कधी कुणाची हत्या, महिलेचा विनयभंग आणि बलात्कार यासारख्या घटना सतत समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर बीडमध्ये सतत वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. नुकताच पोलिसाने एका महिलेला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. तर काही तरुणांनी दहशत माजवण्यासाठी एका तरुणाची बोटं छाटली होती. या सर्व घटनांमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

Beed Crime: शाळकरी मुलीला कारमध्ये कोंबलं, विनयभंग करत बेदम मारलं; बीडमधील भयंकर घटना
Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज! बैल शेतात गेला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण, जाब विचारणाऱ्या भावांनाही चोपलं; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com