Mouse And Snake Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mouse And Snake Viral Video : उंदीर मामा चक्क नागाच्या फण्यावर बसला, Video पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात उंदीर सापाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी थेट सापाच्या फणीवर चढतो. साप गोंधळतो आणि उंदीर त्यातून पळ काढतो.

Alisha Khedekar

सोशल मीडियावर दरररोज आपल्या नवनवीन कंटेन्ट पाहायला मिळतो. कधी कधी हे कंटेन्ट आपल्या कल्पनेच्या पलीकडचे असतात. बऱ्याचदा असे व्हिडिओ समोर येतात जे धक्कादायक असतात आणि ते पाहिल्यानंतर क्षणभर विश्वास ठेवणे कठीण होते. अलीकडेच असाच एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये उंदराच्या हुशारीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

उंदीर हा शेतकऱ्यांचा शत्रू असला तरी त्यांना खाणारा साप मात्र शेतकऱ्याचा मित्र आहे. साप उंदरांचा अगदी सहजपणे शिकार करतात. उंदीर सापांच्या आवडत्या यादीत वरच्या क्रमांकावर असतात. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सापाच्या तावडीत शिकार होणार उंदीर मामा स्वतःहूनच खेळ बदलताना पाहायला मिळाला.

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, जेव्हा उंदीर धोक्यात असतो तेव्हा तो आपला जीव वाचवण्यासाठी चालाकी करतो. सापाच्या तोंडाशी असलेल्या उंदीर मामाला साप गिळणार इतक्यात तो पटकन उडी मारून थेट सापाच्या फणीवर चढतो.

त्याच्या या कृतीने साप पूर्णपणे गोंधळून जातो. उंदीर फणीवर चढल्यामुळे, सापाला आजूबाजूला काहीही दिसत नाही आणि तो अस्वस्थ होतो. आणि उंदीर मामाने तिथून पळ काढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT