Mehndi Cookies Video Saam TV
व्हायरल न्यूज

Mehndi Cookies Video: मेहंदी बिस्कीट तुम्ही कधी खाल्लंय का ? लहान मुलांसाठी युनिक रेसिपी, VIDEO व्हायरल

Mehndi Biscuit Video Viral: विविध प्रकारचे बिस्कीट देखील बाजारात उपलब्ध आहेत. जेली, क्रीम, चोकलेट क्रीम, ऑरेंज, स्टोबेरी असे विविध फ्लेवर असलेले बिस्किट्स आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video:

लहान मुलांचं पोट भरणे ही त्यांच्या पालकांसाठी मोठी आव्हानात्मक गोष्ट असते. लहान मुलांना सतत खाऊ म्हणजेच बाहेरचे चमचमीत पदार्थ खावे वाटतात. भाजी, चपाती, वरन, भात खाण्याचा कंटाळा करतात. काही लहान मुलं तर काहीच खायला मागत नाहीत. अशावेळी त्यांना काय स्पेशल करून द्यावं याचा विचार सर्वच पालक करतात. अशात सोशल मीडियावर एक भन्नाट बिस्कीट व्हिडीओ समोर आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजवर तुम्ही लहान मुलांसाठी विविध प्रकारचे चॉकलेट ( Chocolate) पाहिले असतील. काही चॉकलेट तर प्राण्यांच्या आकाराचेही आहेत. तसेच विविध प्रकारचे बिस्कीट देखील बाजारात उपलब्ध आहेत. जेली, क्रीम, चोकलेट क्रीम, ऑरेंज, स्टॉबेरी असे विविध फ्लेवर असलेले बिस्किट्स आहेत. मात्र तुम्ही कधी मेहंदी बिस्कीट खाल्लंय का?

नक्कीच बऱ्याच व्यक्तींनी असं बिस्कीट खाल्लं नसणार आणि या बाबत कधी ऐकलं देखील नसणार. मेहंदी बिस्कीटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय. लहान मुलांच्या नाश्त्यासाठी आणखी एक कल्पना आणि नवीन रेसिपी मिळाली म्हणत अनेकांनी या व्हिडिओवर लाइक्सचा वर्षाव केलाय.

व्हिडीओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने बिस्किटे मिश्रण बनवून घेतले आहे. त्यानंतर हे मिश्रण तिने हाताचा पंजा असलेल्या एका साचात टाकले आहे. यामध्ये सर्व मिश्रण टाकून तिने ते बेक करून घेतले आहे. पुढे बेक केलेलं हाताचं बिस्कीट सजविण्यासाठी तिने यावर कोणतीही क्रीम कार्टून सारखी टाकलेली नाही.

अनेक बिस्किटांचा प्लेन क्रीम लावली जाते. किंवा मग एखादं कार्टून काढलं जातं. मात्र या महिलेने या बिस्किटांवर हातावर जशी मेहेंदी काढतात अगदी तशीच मेहंदी काढली आहे. मेहंदी बिस्कीटचा हा व्हिडीओ @sharmeendoeshenna या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हे अनोखं बिस्कीट पाहून नेटकरी देखील चकित झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Rutuja Bagwe Photos: काळ्या रंगाच्या साडीत ऋतुजाचं सालस सौंदर्य, फोटो पाहून हृदय धडधडेल

Gold Rate: चांदीनंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण; एक लाखावर येणार सोनं? काय आहे कारण जाणून घ्या

Sitaphal Kheer Recipe : अवघ्या १० मिनिटांत स्वीट डिश तयार, झटपट बनवा सर्वांना आवडेल अशी सीताफळाची खीर

Navi Mumbai Famous Place: लोणावळा, खंडाळा फिरून कंटाळा आला? नवी मुंबईतील ही ५ ठिकाणे नक्की फिरा

SCROLL FOR NEXT