'मृत्यू कधी कोणत्या क्षणी ओढवेल' हे कोणीच सांगू शकत नाही. आजकाल हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशीच धक्कादायक घटना मथुरेतून समोर आली आहे. एका व्यक्तीचा अवघ्या ७ सेकंदात मृत्यू झाला आहे. अचानक ओढवलेल्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती त्याचं नियमित काम करताना दिसत आहे. तो गेटमधून बाहेर जात आहे. परंतु गेटमधून बाहेर जाण्याआधीच तो अचानक जमिनीवर धाडकन पडतो. अवघ्या काही सेकंदातचं त्याचा जीव जातो. हा व्यक्ती अचानक खाली पडल्याने आजूबाजूचे लोक जमा होतात. या माणसाला काय झालं याची माहिती मिळेपर्यंतच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याआधीच या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता
नेमकी ही घटना काय आहे?
मथुरा येथे एका ३४ वर्षीय व्यक्तीचा अवघ्या ७ सेकंदात मृत्यू झाल्याची घटना घडली. ही व्यक्ती आग्र्याहून मथुरा येथे त्याची कार घेऊन आली दरम्यान त्याने कार घरी पार्क केली. गेटमधून बाहेर पडताच त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला आहे. व्यक्ती परत उठलाच नाही. दरम्यान तेथील आजूबाजूंच्या माणसांनी ताबडतोब व्यक्तीला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक ओढवलेल्या या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी हे हॉर्ट अटॅक आल्याचे सांगितले आहे. अनेकदा हॉर्ट अटॅक येताना कोणतेही लक्षणे दिसत नाही. मात्र चक्कर येते ज्याला सायलेंट हॉर्ट अटॅक असे म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.