Teacher Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ‘अगं कमला उठ पाय धू...’ शिक्षिकेची भन्नाट ट्रिक, मुलांना तोंडपाठ झाले महाराष्ट्राचे ३६ जिल्हे, व्हिडीओ व्हायरल

Teacher Viral Video: शिक्षिकेने मुलांना महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी भन्नाट ट्रिक सांगितली. तिचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी चांगलीच दाद दिली आहे.

Manasvi Choudhary

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाला विशेष महत्व आहे. आयुष्याच्या जडणघडणीत आई वडीलानंतर शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकाने शिकवलेलं ज्ञान मुलं आत्मसात करत असतात. मुलांना समजावं यासाठी ते सोप्या मार्गाने सांगतात. असाच एका शिक्षिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

ऑनलाइन शिक्षण हे सध्या बरेचजण घेत असतात. ऑनलाइन पद्धतीने शिकवून ते व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. यामुळे अनेकांना सोप्या पद्धतीने ज्ञान घेता येते. यासाठी काही सोप्या ट्रीक देखील असतात. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, रंजना जाधव ही शिक्षिका मुलांना महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची सोप्या पद्धतीने ओळख करून देत आहे. ज्यामुळे ते लक्षात ठेवणं देखील सोप्प झालं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मराठी शाळेतील आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिकेने फळ्यावरती महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे लिहली आहेत. मुलांना ३६ जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी शिक्षिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. तिने 'अगं कमला उठ पाय धू,छान रस भजी चहा बनव' असं लिहलं आहे. या वाक्यावरून त्यांनी जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी सांगितले आहे.

शिक्षिकेने 'अगं कमला उठ पाय धू,छान रस भजी चहा बनव' असं लिहलं आहे. ज्यावरून तिने फळ्यावरती प्रत्येक नावानुसार जिल्ह्यांची नावे लिहली यावरून या एका वाक्यावरून मुलांना ३६ जिल्ह्यांची नावे पटकन आठवणार आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. लाखो लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आहे. अनेकांनी लाईक्स करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. शिक्षिकेचे विशेष कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

Dry fruits Ladoo: लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू; सोपी रेसिपी वाचा

Sev Recipe : दिवाळीला घरीच बनवा चटपटीत तिखट शेव, मार्केटपेक्षा चव भारी

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

SCROLL FOR NEXT