
कामाच्या ठिकाणी सुट्टी मिळवणे आजकाल कठीण झालं आहे. अनेकांना अचानक कामानिमित्त सुट्टी पाहिजे असते तेव्हा देखील सुट्टी मिळत नाही अशापरिस्थितीत अनेक लोक वेगवेगळे कारण देतात. मात्र आता एका मुलीने सुट्टीसाठी अनोखा मार्ग शोधला आहे. तिने जे केलं आहे ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. जे पाहून तुम्हालाही विश्वास बसत नाही. असाच एका मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीमध्ये पाच दिवसाची सुट्टी मिळवण्यासाठी एका मुलीने अनोखी शक्कल लढवली आहे. या मुलीने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर या मुलीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पुण्यातील एका मुलीने सुट्टी मिळवण्यासाठी तिचा अपघात झाल्याचं चित्र तयार केलं आहे. तिने चेहऱ्यावर असा मेकअप केला आहे जो पाहून तिची शस्त्रक्रिया झाली आहे असचं दिसत आहे. ऑफिसमध्ये सुट्टी मिळत नसेल तर तुम्ही असच करू शकता असं मुलीला सांगायचं आहे. या मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे आहे. आयटीमध्ये काम करणाऱ्यांनी सुट्टी मिळणे कठीण असते.
पुढे या मुलीने तिच्या मॅनेजरलाही याविषयी सांगितलं आहे. व्हिडीओ कॉलमध्ये मुलगी म्हणतेय, 'नमस्कार सर! शुभ सकाळ, सर सकाळी ऑफिसला येताना माझा अॅक्सिडंट झाला आहे. मला टाके पडले आहेत. डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे. मग मी सुट्टी घेऊ का? मी सुट्टीसाठी अर्ज करू का? असं म्हणते आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.