man sleeping on railway track in mumbai viral video saam tv
व्हायरल न्यूज

Video Viral: दारूच्या नशेत थेट रेल्वे रूळावर झोपला; समोरून अचानक ट्रेन आली आणि...! मुंबईतील स्टेशनवरील घटनेचा Video Viral

man sleeping on railway track in mumbai viral video: मुंबईतील CSMT हार्बर लाईनवर एका व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेन काही काळ थांबवावी लागल्याचा दावा केला जातोय.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दररोज काही ना काही घडत असतं. यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपल्याचं दिसतंय. त्यामुळे काही काळ लोकल ट्रेन थांबवावी लागल्याचा दावा केला जातोय.

काय घडलंय व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती रेल्वे रुळांवर झोपलेली दिसतेय. ही व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचं म्हटलं जातंय. यावेळी त्याच्याकडे बाटल्या किंवा इतर वस्तू जमा करण्याची पांढरी पिशवी देखील दिसतेय. तर या पुरुषाने डोकं थेट एका रुळावर ठेवलेलं दिसतंय. या रूळारून ट्रेन आल्यानंतरही ती व्यक्ती झोपलेली उठली नाही.

कुठे घडलाय हा प्रकार?

हा प्रकार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मधील हार्बर लाईनवर घडल्याचा केला जात आहे. एक माणूस ट्रॅकवर झोपला आहे. त्यामुळे येणारी लोकल काही काळ थांबलेली दिसतेय. मात्र या घटनेबाबत अधिकृत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी 'मुंबईत काहीही घडू शकतं' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी 'धावत्या शहराला एका थांबवण्याचा विचित्र मार्ग' असं म्हटलंय. काहींनी मात्र हा प्रकार अत्यंत बेजबाबदार आणि जीवघेणा असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...

Maharashtra Live News Update: जळगवात सोन्याचे दर 3 हजारांनी घसरले, तर चांदीचा भावही घसरला

JEE Mains Result: डोबिंवलीचा लेक राज्यात पहिला, जेईईमध्ये ९९.९९ टक्के मिळवले

Om Chanting: २१ दिवस 'ॐ' म्हटलं तर चमत्कारी बदल होणार; आत्ताच वाचा फायदे

Ajit Pawar Death : अजितदादांना राष्ट्रवादीमधील अनेकांनी त्रास दिला, दिग्गज नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT