Man Dragged On Minibus Bonnet Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Viral Video: भयानक! आधी धडक दिली, नंतर मिनी बसच्या बोनेटवरुन फरफटत नेले; थरकाप उडवणारा VIDEO

Gangappa Pujari

Delhi Viral Video:

राजधानी दिल्लीमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील कोटला मुबारकपूर भागात एका व्यक्तीला मिनी बसच्या बोनेटवर बसवून फरफटत नेल्याची घटना घडली. या मिनी बसने तरुणाला धडक दिल्यानंतर त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीमधील (Delhi) लजपत नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डीएनडी फ्लायओव्हरवरून नोएडाच्या दिशेने जात असताना एका तरुणाला भरधाव मिनी बसने धडक दिली. धडक दिल्यानंतर संतापलेल्या तरुणाने बस थांबवण्याचा प्रयत्न केला.

गाडी थांबवण्यासाठी तो माणूस गाडीच्या बोनेटवर चढला तेव्हा ड्रायव्हरने गाडी तशाच अवस्थेत नोएडाच्या दिशेने वळवली आणि डीएनडी फ्लायओव्हरवर कडे पळवायला सुरूवात केली. यावेळी बोनेटवरील व्यक्ती गाडी थांबवण्याची विनंती करत आहे, मात्र व्हॅन चालकाने गाडी थांबवली नाही. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या मिनी व्हॅनच्या बोनेटला लटकत आहे. तो माणूस ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगत आहे पण तो व्हॅन थांबवत नाही. ही घटना 17 डिसेंबरच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित तरुण हा सध्या सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्याने तक्रार दिल्यास संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या व्हॅन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर काही जणांनी हा प्रकार म्हणजे अमानवी कृत्य असल्याचे म्हणले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT