Heart Attack Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Heart Attack Viral Video: भाच्याचा लग्नात मामा आनंदात नाचत होता, काही सेंकदात झालं होत्याचं नव्हतं, Video व्हायरल

Rajasthan News: तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे, त्यातच अशीच एक दुर्देवी घटना राजस्थानमधून समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.

तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे, त्यातच अशीच एक दुर्देवी घटना राजस्थानमधून समोर आली आहे,ज्यात भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचताना अचानक मामा जमिनीवर कोसळतो,सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, लग्नाच्या एका कार्यक्रमात पीडित व्यक्ती नाचताना दिसत आहे तसेच त्यांच्या डोक्यावर एक मडके आहे. त्याच्यांसोबत काही महिला आणि तरुणीही डीजेच्या तालावर नाचत आहे. मात्र रस्त्यावर नाचत असताना ते अचानक खाली कोसळताना दिसत आहेत.

न्यूज १८ मराठीच्या वृत्तानुसार, व्हायरल होत असलेली घटना राजस्थानच्या झुंझुन जिल्ह्यातील नवलगढ भागातील लोछवा येथील आहे. मृत व्यक्तीचे नाव कमलेश असल्याचे समजते. कमलेश हे २० एप्रिल रोजी आपल्या भाच्याच्या लग्नासाठी लोछवा येथे आले होते.

कमलेश हे जमिनीवर अचानक पडल्यानंतर त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. कार्डियक अरेस्टमुळे कमलेश यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. कमलेश यांच्या अंत्यसंस्कारानंतर कमलेश यांच्या भाच्याचा विवाह सोहळा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj forts: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर भगवान शिवाचं मंदिर का होतं?

फक्त आमदारकी रद्द करण्यासाठी रात्री 10.30 वाजता सुरु केलं सचिवालय, काँग्रेसच्या बड्या नेत्यावर कारवाई! नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नागोठणे येथे बस अपघात; २ ठार, २२ जखमी

CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई

Sanjay Dutt Restaurant: 'जिवंत माशांचे' कॉकटेल; संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये विचित्र मेन्यू

SCROLL FOR NEXT