Makeup Hacks : दिवाळी असो वा भाऊबीज: आय मेकअप अन् लिपस्टिकच्या या ५ ट्रिक्सने मिळवा गॉर्जियस फेस्टिव्ह लुक

simple festive makeup look for ethnic outfits : दिवाळी असो वा भाऊबीज, परफेक्ट फेस्टिव लुक मिळवण्यासाठी मेकअपचे काही बेसिक नियम माहित असणे गरजेचे आहे.
FESTIVE MAKEUP 5 EASY TIPS FOR A GORGEOUS LOOK
FESTIVE MAKEUP 5 EASY TIPS FOR A GORGEOUS LOOKsaam tv
Published On: 

दिवाळी असो वा भाऊबीज, प्रत्येक सणाला सुंदर आणि आकर्षक दिसण्याची इच्छा कोणाला नसते? यासाठी आपण महागडे ड्रेस आणि हेअरस्टाईल करतो, पण योग्य मेकअपशिवाय तो लुक अपूर्णच राहतो. विशेषतः लिपस्टिकचा शेड आणि आय मेकअपचे अचूक कॉम्बिनेशन तुमच्या संपूर्ण लूकला क्लासी किंवा अगदी बिघडवू शकते. जर तुम्हालाही या फेस्टिव्ह सीझनमध्ये प्रत्येक फोटोत गॉर्जियस आणि ट्रेंडी दिसायचे असेल, तर मेकअपचे हे ५ सोपे पण महत्त्वाचे नियम नक्की माहीत असायला हवेत.

लाल लिपस्टिक

जर तुम्ही गडद लाल किंवा लाल रंगाची कोणतीही लिपस्टिक लावत असाल, तर डोळ्यांसाठी नेहमी शार्प आयलाइनर निवडा. या दोन्हीचे कॉम्बिनेशन तुम्हाला अतिशय एलिगेंट लुक देते.

FESTIVE MAKEUP 5 EASY TIPS FOR A GORGEOUS LOOK
चहाप्रेमींनो सावधान! चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' ५ गोष्टी, नाहीतर आतड्यांचा होईल सत्यानाश; वाचा सविस्तर

न्युड लिपस्टिक शेड्स

जर तुम्ही न्युड शेडची लिपस्टिक लावण्याचा विचार करत असाल, तर त्यासोबत सॉफ्ट स्मोकी आईज करा. हा लुक खूप क्लासी दिसतो आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

गुलाबी लिपस्टिक

जर तुम्ही गुलाबी रंगाची लिपस्टिक लावत असाल, तर डोळ्यांवर सॉफ्ट ब्राऊन आयशेडो लावा. हा लुक खूप सोफिस्टिकेटेड आणि सुंदर दिसतो.

FESTIVE MAKEUP 5 EASY TIPS FOR A GORGEOUS LOOK
Health Tips : डायबिटीजमध्ये वांगी खाणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? जाणून घ्या

तपकिरी लिपस्टिक शेड

जर तुम्ही ब्राऊन शेडची लिपस्टिक निवडली असेल, तर डोळ्यांना सटल लुक द्या. यासोबत ग्लिटरी शेड आयशेडो आणि डीप ब्राऊन लिपस्टिकचा वापर तुम्हाला एक कूल लुक देईल.

लिप ग्लॉस आणि पिंक आयशेडो

जर तुम्हाला मिनिमम मेकअप करायचा असेल, तर ब्राऊन शेडच्या लिप ग्लॉससोबत पिंक आयशेडो लावा. यामुळे चेहऱ्याला फ्रेश आणि सॉफ्ट फेमिनिन लुक मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.