Pune Shocking Video: पुणे जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने जोर धरला आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठ्या जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान, दौंड तालुक्यातील यवत परिसरात एक धक्कादायक घटना घडली. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा करणारा महत्त्वाचा खांब थेट पुराच्या पाण्यात कोसळला आणि परिणामी संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला.
या संकटच्या वेळी एक नाव घरोघरी पोहोचत आहे ते म्हणजे सचिन राजगुरू यांचे. जे महावितरणचे कर्तव्यदक्ष कर्मचारी (Staff )आहेत. परिस्थिती गंभीर असतानाही कोणतीही भीती न बाळगता आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सचिन राजगुरू यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे आणि तत्परतेमुळे परिसरातील लोकांचे हाल टळले.
घटनेनुसार, मुसळधार पावसामुळे यवतमधील एक वीजखांब तळ्यात कोसळला होता. पाण्यात वीजखांब असल्याने कोणतीही चूक जीवघेणी ठरू शकत होती. अशा कठीण परिस्थितीत वीज पुरवठा सुरू करण्याचे काम केवळ धाडसाच नव्हे, तर अत्यंत काटेकोर दक्षतेने करावे लागते. सचिन राजगुरू यांनी हे आव्हान स्वीकारले आणि जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरून काम सुरू केले.
सर्व घटना वाऱ्याच्या वेगाने समाज माध्यमांवर व्हायरल(Viral) होत आहे. त्यातही या व्हिडिओला नागरिकांकडून मोठी पसंती मिळाली आहे आणि तो आतापर्यंत हजारो व्ह्यूजपर्यंत गेलेला आहे. नागरिकांकडून कर्मचाऱ्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.