काय चाललंय मुंबईत? ९व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Man Throws Off Cat From 9th Floor: सोशल मीडियावर मुंबई शहरातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे मुंबई शहराच्या एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकण्यात आले.
Man Throws Off Cat From 9th Floor
Mumbai shocking VideoSaam Tv
Published On

CCTV Footage Viral Video: प्रगत आणि सुसंस्कृत अशा मुबंई शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात एका व्यक्तीने आपल्या अपार्टमेंटच्या ९व्या मजल्यावरून एका निरागस मांजरीला थेट खाली फेकून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेली घटना मालाडमधील एका नामांकित हाऊसिंग सोसायटीत घडली. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, एका व्यक्तीने मांजरीला उचलून आपल्या घराबाहेरील गॅलरीतून खाली फेकले. हे दृश्य इतकं अमानवी आहे की ते पाहून प्राणीप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. सोशल मीडियावर या घटनेने अनेक प्रतिक्रिया उमटवल्या आहेत आणि संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

या घटनेनंतर संपूर्ण शहरातून आणि सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका यूजरने कमेंट केली,''पोलिसांनी चांगले फटके देयला पाहिजे याला'' तर काहींनी'' आमच्या हातात द्या या व्यक्तीला आम्ही मारुन काढू'' तर तिसऱ्या यूजरनेही म्हटलं,''गरज काय रे मानसा याची'' अशी तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिलेल्या आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केलं आहे. सध्या हा व्हिडिओ(Video) एक्सवर अर्थात ट्वीटर अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Man Throws Off Cat From 9th Floor
संभाजीनगरमध्ये वादळात सापडलं विमान, इमर्जन्सी लँडिंगमुळे अनर्थ टळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com