Viral Video Canva
व्हायरल न्यूज

Viral Video: घोडा शर्यतीदरम्यान टांगा उलटला; घोडे रस्त्यावर घसरले, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका गावात भरवण्यात आलेल्या घोडागाडी स्पर्धे दरम्यान एक भयानक अपघात झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका गावात भरवण्यात आलेल्या घोडागाडी स्पर्धे दरम्यान एक भयानक अपघात झालेला आहे. सध्या या अपघाताचा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पर्धेत धावणाऱ्या घोड्याचा अचानक पाय घसरल्याने अपघात झाला. या अपघाताची संपूर्ण दृश्ये मोबाईमध्ये कैद झाली आहेत.

हातकणंगे तालुक्यातील पुलाची शिरोली इथे शिवलिंग बिरदेव आणि पीर अहमदसो यात्रा निमित्ताने घोडागाडी आणि बैलगाडी (bullock cart)शर्यतीचे आयोजन केलं होतं. आज सकाळी सकाळी ११ च्या सुमारास शिरोलीच्या माळवाडी परिसरात डबल घोडागाडी स्पर्धेची शर्यत सुरू झाली.दरम्यानच या स्पर्धेत धावणाऱ्या घोड्याचा अचानक पाय घसरल्याने हा अपघात झाला.

सध्या सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरील @mrbeen979619 या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी दिसून येत आहे. जेव्हा शर्यत सुरु होताच घोडागाडीच्या पुढे वाहन पळताना दिसत आहे,त्यांच्या पाठून भरधाव वेगाने अनेक घोडागाडी (Horse)येते. मात्र काही क्षणातच त्यातील एक घोडागाडी वेगात येऊन रोडच्या दुसऱ्या बाजूला आदळते.

घोड्याचा अचानक पाय घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातानंतर घोडा गंभीर जखमी झाला आहे. तर चालकासह एक दुचाकी स्वार ही जखमी झाला आहे. एका बाजूला नियम आणि अटींचे पालन न करत शर्यती भरवल्या जात आहेत. खुल्या मैदानात ही शर्यत न घेता शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने माळवाडी परिसरत डांबरी रस्त्यावर या स्पर्धा घेतल्या. त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT