Madhuri Elephant Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Madhuri Elephant Video: कोल्हापूरकर 'तिच्या' प्रेमात का आहेत? माधुरी हत्तीणीचा 'हृदयस्पर्शी' व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

माधुरी हत्तीणीचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने सोंडेने एका मुलाला वाचवले असून कोल्हापूरकर तिच्या प्रेमात पडले आहेत. नेटकऱ्यांनी हत्तीणीचं कौतुक केलं आहे.

Manasvi Choudhary

नांदणी गावातील माधुरी हत्तीण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. यामुळे नांदणी येथील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. माधुरी हत्तीसाठी अनेक मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. अशातच सोशल मीडियावर माधुरी हत्तीणींचा एक प्रेमळ व्हिडीओ व्हायरल होत आहे.

असं म्हटलं जातं की, मुक्या प्राण्यावर तुम्ही एकदा जीव लावला की ते देखील तुम्हाला तेवढाच जीव लावतात. अनेक जण घरात प्राणी पाळतात आणि त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवतात असच काहीसं या हत्तीणीचं आहे. हत्ती हा प्राणी अत्यंत प्रेमळ असतो. माधुरी हत्तीण ही देखील नांदणी गावची आहे. गेली ४० वर्षाहून अधिक काळ या हत्तीणीने नांदणी गावातील लोकांसोबत एकत्र घालवला आहे. नांदणीतील विविध कार्यक्रमांमध्ये हत्तीण दिसत आहे.

सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीणीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झालेली दिसतेय आहे. आणि अशावेळी हत्तीण जेथे फिरतो आहे तेथे एक छोटा मुलगा पडल्याचं चित्र दिसतं आहे. तेथील सर्वजण घाबरले आहेत. आता हत्तीण नेमकं काय करणार? हत्तीणीच्या तावडीतून मुलगा कसा सुटणार? अशावेळी हत्तीणीने आपल्या सोंडेच्या सहाय्याने त्या मुलाला लोकांकडे दिले आहे. सोशल मीडियावर याचदरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हायरल व्हिडीओला लाखांमध्ये लाईक्स आणि व्ह्यूज आले असून नेटकऱ्यांनी देखील हत्तीणीचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit: कुरळे केस अन् केशरी साडी, तेजस्विनीचं सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Eknath Shinde Shivsena : नगरमध्ये चक्क पक्ष प्रवेश घोटाळा? शिंदे गटाच्या नेत्यावर बोगस यादीचा आरोप, राजकारण तापलं

Ladki Bahin Yojana: सोलापुरातील ४३० भावांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, महिनाभरात इतक्या लाखांची वसूली होणार

Freshers Job Hiring : IT फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! इन्फोसिसकडून २०,००० पदांसाठी भरती

Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

SCROLL FOR NEXT