Ghaziabad Saam Tv
व्हायरल न्यूज

चिमुकला लिफ्टमध्ये शिरला अन् पुढे जे घडलं ते पाहून सर्वच हादरले; VIDEO

Child opens lift door: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर प्रत्येकजण घाबरुन गेला आहे. नक्की काय घडले आहे त्या व्हिडिओत ते तुम्ही एकदा पाहा.

Tanvi Pol

Shocking lift video: लिफ्टमध्ये चढणं-उतरणं ही रोजच्या जीवनातली गोष्ट झाली असली, तरी यामध्ये जर थोडीशीही गडबड झाली, तर मोठा अपघात होऊ शकतो. सध्या याचा प्रत्यय नुकताच एका लहान मुलाच्या थरारक घटनेतून आला आहे. सोशल मीडियावर सध्या एक सीसीटीव्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा चालू लिफ्टचा दरवाजा उघडताना दिसतो आणि हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो. ही घटना पाहून अनेकांचं काळजाचं पाण्यावर येतं.

ही घटना एका रहिवासी इमारतीतील आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, लहानसा मुलगा साधारण या मुलाचे(Little Boy) वय ६ ते ७ वर्ष असेल. जो लिफ्टमधून जात असताना तो त्यात अडकला जातो. मात्र काही वेळ वाट पाहूनही लिफ्टचा दरवाजा न उघडल्याने चिमुकला घाबरून जातो. मग काय चिमुकला तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. थोड्याच वेळात त्याला दरवाजा उघडण्यात यश येतं आणि तेव्हाच लिफ्टच्या बाहेरील एक व्यक्ती त्याला पाहतो आणि मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु करतो.

अनेक प्रयत्नानंतर चिमुकला लिफ्टमधून बाहेर पडतो. या घटनेत सुदैवाने चिमुकल्याला कोणीही जखमी झालं नाही. लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमुळे ही घटना कैद झाली आणि पुढील काही वेळात सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. संपूर्ण घटना गाझियाबादमधील असल्याचे समोर आले आहे. हा प्रसंग क्षणभर घाबरवणारा असून प्रत्येकाने पालकाने आपल्या चिमुकल्या मुलांवर योग्य लक्ष दिले पाहिजे हे या व्हिडिओतून शिकता येते.

सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. घटना जशी व्हायरल झाली त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये पालक वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ''अशा घटना पाहून तरी काही पालक सावध होतील'' अशा प्रतिक्रिया काही यूजर्संकडून आलेल्या आहेत. दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''तो बचावला गेला ना ते चांगले झाले'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT