Pune News Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune News: दबक्या पावलांनी आला अन् काळूला घेऊन गेला, पुण्यातील बिबट्याच्या हल्ल्याचा थरार CCTV मध्ये कैद

Viral Cctv Video: सोशल मीडियावर सध्या पुणे जिल्ह्यातील घडलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात पुणे जिल्ह्यातील एका गावात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे.

Tanvi Pol

Pune Viral Video: गेल्या काही वर्षापासून पुणे जिल्ह्यातील अनेक गावात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून आलेला आहे.बऱ्याचदा बिबट्यांच्या हल्ल्यात काही नागरिकांना तर अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.त्यातच सध्या पुणे जिल्ह्यातील नारायण गावात एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याच्या जोडीपैकी एका कुत्र्याचा मृत्यू झालेला आहे.संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

नेमके घडले तरी काय?

नारायणगाव परिसरात वारुळेवाडी येथे कंपाउंड वरून उडी मारली. बंगल्याच्या आवारात चोर पावलांनी प्रवेश केलेल्या बिबट्याने(Leopard) काळू आणि बाळू या दोन पाळीव कुत्र्यापैकी बाळू या कुत्र्याला उचलून नेले.सध्या या घटनेचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.जीवापाड प्रेम असलेल्या पाळीव कुत्र्याच्या जोडी पैकी बाळूचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे संते कुटुंबियांमधून दुःख व्यक्त होत आहे.

वारूळवाडी, नारायणगाव परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन विभागाने यापूर्वी मागील दीड वर्षात परिसरात ३२ बिबटे जेर बंद केले आहेत. मात्र बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. १९ जानेवारी २०२५ रोजी एक नर बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला आहे.सोशल मीडियावर यापूर्वीही असे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) पाहून नेटकरी वर्ग पुन्हा एका घाबरुन गेलेला आहे.

टीप : बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT