Gautami Patil Dance Video Saamtv
व्हायरल न्यूज

Gautami Patil Video: जोरदार जुगलबंदी! चिमुकली स्टेजवर अशी थिरकली; डान्स पाहून गौतमीही फिदा; VIDEO

Gautami Patil Dance Video: चिमुकलीचा डान्स अन् उत्साह पाहून गौतमी पाटीलही थक्क झाली. तिच्या या डान्सला प्रेक्षकांनीही टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

Gautami Patil Video:

आपल्या तडफदार लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो. गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते. अनेकदा गौतमीच्या स्टेजवर प्रेक्षकांच्याही डान्सचा जलवा पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गौतमीला टक्कर देताना दिसत आहे.

गौतमीसोबत चिमुकलीचा जबरदस्त डान्स..

गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची विशेष ओळख करुन द्यायची गरज नाही. आपल्या अदा आणि डान्सने तिने सर्वांनाच घायाळ केले आहे. गौतमीच्या कार्यक्रमांची, तिच्या जबरदस्त डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळते. गौतमी जितकी तिच्या कार्यक्रमांमुळे चर्चेत येते तितकीच तिच्या सोशल मीडिया पोस्टचीही चर्चा होत असते.

प्रेक्षकांचा प्रतिसाद...

सध्या गौतमीने एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. ही चिमुकली स्टेजवर खुद्द नृत्यांगणा गौतमी पाटीलला टक्कर देताना दिसत आहे. 'ऐवज हवाली केला' या गाण्यावर गौतमीसोबत थिरकणाऱ्या या चिमुकलीच्या डान्सला प्रेक्षकांनीही टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर गौतमी पाटीलसोबत चिमुकली जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. चिमुकलीच्या स्टेप्स अन् डान्सचा उत्साह पाहून गौतमी पाटीलही थक्क झाली. व्हिडिओच्या शेवटी ती तिचे कौतुकही करताना दिसत आहे.

इतकेच नव्हेतर खुद्द गौतमी पाटीलने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी तिने गौतमीला टक्कर दिल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी बारक्या गौतमीचा जलवा.. अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT