Bike Stunt Saam TV
व्हायरल न्यूज

Bike Stunt: भररस्त्यात तरुणांची धावत्या बाईकवर धोकादायक स्टंटबाजी; मग घडला भयंकर अपघात

Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Shocking Stunt Clip: भररस्त्यात काही तरुणंनी धावत्या बाईकवर स्टंटबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अचानक त्यातील एकाचे वाहनावरील संतुलन हरवते आणि अनियंत्रित झालेली बाईक समोरील वाहनाला जाऊन धडकते. तरुणांच्या या धोकादायक वर्तनामुळे रस्त्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, अशा स्टंटबाजीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ तुम्हाला एक महामार्ग दिसत आहे. जो एक मुख्य रस्ता असून रात्रीची वेळ असून अनेक जड वाहने तेथून जात आहेत. त्यामध्ये काही तरुण धावत्या बाईकवर(Bike) येतात आणि बाईकवर झोपूनच रस्त्यावर बाईक चालवत असतात. अतिशय चुकीच्या आणि धोकादायररित्या सर्वजण बाईक चालवत असतात.

रस्त्यावर वाहनाचा जोरदार वेग आणि वाहतुकीचे सर्व नियम मोडून असे तरुण बाईक चालवत असतात. काही वेळात त्यातील एक तरुणाचे बाईकवरील नियंत्रण सुटते आणि थेट त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रेकशी त्याची जोरदार धडक होते. ही धडक इतकी जोरदार असते की तरुण रस्त्यावर जोरदार आपटला जातो. मात्र,पुढे नक्की काय घडले ते अद्याप समजले नाही.

तरुणांचा सर्व थरार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून सोशल मीडियावर लगेच व्हायरल केला आहे. आता तो व्हिडिओ प्रत्येक माध्यमांवर व्हायरल(Viral) होत असून त्यावर नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील noble_mobile_shopee या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT