Viral Video: तेरा ध्यान किधर है... धावत्या दुचाकीवरून बायको उतरली, नवऱ्याला काहीच समजलं नाही, पाहा व्हिडिओ

Man Bike Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही तसाच काहीसा आहे. जिथे नेमके काय घडले ते तुम्हीच पाहा.
Man Bike Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video News: आजकाल वाहतूक आणि रस्त्यावरील अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याचदा वेळा निष्काळजीपणा आणि जागरूकतेचा अभाव इतका वाढतो की, त्याचा फटका अपघाताच्या रूपात सहन करावा लागतो. सध्या अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) व्हिडिओत दिसतं की, एक दुचाकी शहराच्या रस्त्यावर धावत असते. त्यावर नवरा पुढे चालवत असून, बायको मागे बसलेली आहे आणि त्यांत्यामध्ये एक लहान मुलगा बसलेला असतो. अचानक, दुचाकी धावत असतानाच बायको काही कारणास्तव दुचाकीवरून खाली उतरते. हे अचानक झाल्यामुळे हा क्षण धोकादायक वाटतो. पण आश्चर्य म्हणजे नवऱ्याला जराही कल्पना नसते पत्नी खाली उतरलेली आहे आणि तो दुचाकी चालवत राहतो.

या घटनेनंतर रस्त्यावरुन जात असलेला एक दुचारीस्वार महिलेच्या पतीचा पाठलाग करतो आणि त्याची पत्नीपाठीच रस्त्यावर राहिली आहे असं सांगतो. सर्व प्रकार त्याच व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ एक्सवरील @terakyalenadena या अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून नेमकी घटना कुठली आहे ते समजले नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने कमेंट केली,''आजपर्यंतचा कमाल व्हिडिओ आहे'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''एका वेळेस वाटते तिचा अपघात(Accident) होईल'' तर काहींनी मजेशीरही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Man Bike Viral Video
Delhi Couple Viral Video: प्रेम की अश्लील चाळे, धावत्या वाहनात जोडप्याने मर्यादा ओलांडल्या, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com