Pune Crime Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune Crime: सराफा दुकानात खरेदीच्या बहाण्याने आल्या अन् ३२ हजारांचे दागिने केले लंपास; VIDEO

Gold Theft Video: सध्या सोशल मीडियावर चोरीच्या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. झालेली चोरीही दोन महिलांनी केली असून, ज्या प्रकारे त्यांनी चोरी केली त्याचीच सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

Tanvi Pol

Shirur News: शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात भरदुपारी दोन अज्ञात महिलांनी खरेदीच्या निमित्ताने एका सराफा दुकानात प्रवेश केला. त्यानंतर सोन्याच्या कानातील रिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलांनी तब्बल ३२,०० रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून शिरूर पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

खरेदीच्या बहाण्याने दिशाभूल; चतुराईने केली चोरी

फिर्यादी अमोल कचरू दहिवाळ (वय ३४, व्यवसाय ,सराफ, रा. रौनिकनगर सोसायटी, दौंड) हे त्यांच्या अवधूत ज्वेलर्स या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार करत होते. दिनांक ३ मे २०२५ रोजी दुपारी साधारण ४.३० ते ४.४५ च्या दरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या दुकानात आल्या.

सोन्याच्या(Gold) कानातील रिंग पाहण्याच्या बहाण्याने त्या दोन महिलांनी दुकानदार दहिवाळ आणि त्यांच्या भावाकडून विविध दागिने दाखवण्यासाठी सांगितले, त्यानंतर दुकानात असलेल्या गर्दीचा आणि दुकानदारांच्या गाफीलपणाचा फायदा घेत, त्या महिलांनी तब्बल ४ ग्रॅम २०० मिली वजनाची आणि अंदाजे ३२,०० रुपये किमतीची 'कलकत्ता ए प्रकार'ची सोन्याची रिंग चलाखीने चोरून नेली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाला सुराग

घटनेनंतर अमोल दहिवाळ यांनी तत्काळ शिरूर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्र. 302/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 379 सह गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात या दोघी महिला ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आल्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी परिसरातील इतर दुकानांच्या व रस्त्यावरील सीसीटीव्ही(CCTV) फुटेजचीही तपासणी सुरू केली आहे.

टीप: चोरीच्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT