Snake Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Snake Shocking Video: शांत झोपेत असताना अचानक आला किंग कोब्रा, हाता-पायावर फिरून नंतर...; तरुणाने स्वत:च काढला VIDEO

Dangerous Snake Video: सोशल मीडियावर कायम अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ सापाचा आहे. मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Scary Snake Video: सोशल मीडियावर सध्या प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडेल असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण झोपेत गाढ असताना त्याच्या पायाशी अचानक येऊन बसतो एक भलामोठा किंग कोबरा. सुदैवाने तरुणाला यामध्ये काहीही दुखापत झालेली नाही.

घडलं तरी काय?

एक तरुण घरात शांत झोपलेला असतो. काही वेळात त्याला पायावरुन काही तरी वळवळ सुरु असल्याचा स्पर्श होतो तर तो पाहतो तर चक्क त्याच्या पायावर किंग कोब्रा(Cobra Snake) असतो.घाबरून न जाता, तो तरुण पूर्ण शांत राहिला. काही क्षणांत कोब्रा त्याच्या हात-पायावरून सरकून बाजूला गेला. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ स्वतःच त्या तरुणाने मोबाइलमध्ये शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तराखंडच्या एका गावातील असल्याचे समजत आहे आणि हा व्हिडिओ आता @Sheetal2242 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ देशभरातील नेटकऱ्यांनी पाहिला असून त्याला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

अनेकांनी तरुणाच्या धैर्याचे कौतुक केले असून, "हा व्हिडिओ(Video) पाहून अंगावर शहारे येतात" तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मी असतो तर वेगळच काही झालं असतं'' अशा कमेंट्स येत आहेत. वनविभागानेही या प्रकाराची दखल घेतली आहे. सुदैवाने तरुणाला कोणतीही इजा झाली नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT